शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी उल्लेख केलेले गाव अजूनही अंधारात

By admin | Updated: August 18, 2016 06:08 IST

हाथरसमध्ये नागला फटेला नावाचे खेडे आहे. दिल्लीहून तीन तासांत तेथे पोहोचता येते; मात्र या गावात वीज पोहोचण्यासाठी ७० वर्षे लागली, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी

- शीलेश शर्मा, नवी दिल्ली

हाथरसमध्ये नागला फटेला नावाचे खेडे आहे. दिल्लीहून तीन तासांत तेथे पोहोचता येते; मात्र या गावात वीज पोहोचण्यासाठी ७० वर्षे लागली, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात केले होते. त्यांच्या या विधानाने गावातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण यातील अनेक जण आजही विजेविना जगत आहेत. या गावात ६०० घरे असून, त्यातील ४५० घरांत आजही वीज नाही. ज्या १५० घरांत वीज आहे ती त्यांनी विंधन विहिरीसाठी बसविलेल्या रोहित्रावर आकडे टाकून घेतली असून, त्याबदल्यात ते दक्षिणांचल विद्युत वितरण निगमला दर दोन महिन्याला ३९५ रुपये देतात, असे गावचे सरपंच योगेश कुमार यांनी एका दैनिकाला सांगितले. कदाचित पंतप्रधानांना आमच्या गावातील परिस्थितीची कल्पना दिली गेली नसेल, असे गावातील एक रहिवासी उलानूर उस्मानी यांनी सांगितले. नागला फटेला हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव राजधानी दिल्लीपासून ३०० कि.मी. अंतरावर आहे. या गावात ९०० नोंदणीकृत मतदार आहेत. पंतप्रधान ग्रामीण विद्युतीकरण मोहिमेअंतर्गत पायाभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या १०,०४५ गावांत नागला फटेलाचा समावेश आहे. कळस म्हणजे पंतप्रधान कार्यालयाने या गावातील ग्रामस्थ टीव्ही पाहत असल्याची छायाचित्रे स्वातंत्र्यदिनी शेअर केली. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर ‘हसावे की रडावे’, अशी अवस्था ग्रामस्थांची झाली. ही छायाचित्रे आमच्या गावची नाहीत. फुगे असलेले छायाचित्र नागला सिंधी या गावचे असू शकते. हे गावही हाथरसमध्ये असून, याच योजनेअंतर्गत त्याचे विद्युतीकरण झाले आहे, असे नागला फटेलाचे माजी सरपंच देवेंद्रसिंह यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता व्ही. एस. गंगवार यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, १९८५ मध्येच या गावाला वीज पुरवठा करण्यात आला आहे. अद्याप दूरचे स्वप्नचऊर्जा मंत्रालयानुसार १८ हजार ४७५ गावांचे संपूर्ण विद्युतीकरण मे २०१७ पर्यंत पूर्ण होणार आहे. ‘दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत आमच्या गावच्या विद्युतीकरणासाठी सरकारने व्यवस्था केली, हे खरे आहे. आम्हाला विद्युत खांब, वीजतारा आणि मीटर मिळाले; परंतु वीज पुरवठा अद्यापही आमच्यासाठी दूरचे स्वप्न आहे, असे सरपंच कुमार यांनी म्हटले.