UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:19 IST2025-09-06T13:18:19+5:302025-09-06T13:19:48+5:30
Vikas Yadav Marriage News: उत्तर प्रदेशमधील बाहुबली नेते आणि माजी खासदार डी. पी. यादव यांचा मुलगा विकास यादव याने हर्षिका यादव नावाच्या ३० वर्षीय तरुणीशी विवाह केला आहे. विकास यादव हा नितीश कटारा हत्या प्रकरणातला दोषी आरोपी असून, त्याला कारावासाची शिक्षा झालेली आहेत. ५२ वर्षीय विकास यादव आणि ३० वर्षांच्या हर्षिका यादव यांचा विवाह गाझियाबाद येथे पार पडला.

UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
उत्तर प्रदेशमधील बाहुबली नेते आणि माजी खासदार डी. पी. यादव यांचा मुलगा विकास यादव याने हर्षिका यादव नावाच्या ३० वर्षीय तरुणीशी विवाह केला आहे. विकास यादव हा नितीश कटारा हत्या प्रकरणातला दोषी आरोपी असून, त्याला कारावासाची शिक्षा झालेली आहेत. ५२ वर्षीय विकास यादव आणि ३० वर्षांच्या हर्षिका यादव यांचा विवाह गाझियाबाद येथे पार पडला.
विकास यादव आणि त्याची पत्नी हर्षिका यांच्या वयामध्ये तब्बल २२ वर्षांचं अंतर आहे. दरम्यान, हर्षिका हिचे वडील सरकारी शिक्षक असून, ती उच्चशिक्षित आहे. तिने बीएसी, बीटीसी, एमएससी या पदव्या घेतल्या आहेत. त्याशिवाय तिने टेट परीक्षेतही पात्रता मिळवलेली आहे. ती सध्या इंटर कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करत आहे. हर्षिका ही खूप विनम्र आणि साध्या स्वभावाची आहे, असे तिचे निकटवर्तीय सांगतात.
तर दुसरीकडे तिचा पती विकास यादव हा गुन्हेगारी पार्श्वभूमीवरचा आहे. तसेच माजी खासदार असलेले त्याचे वडील डी.पी. यादव हेसुद्धा उत्तर प्रदेशमधील बाहुबली नेते म्हणून ओळखले जातात. दरम्यान हर्षिका आणि विकास यांच्यातील विवाहाला राजकीय किनार असल्याचेही बोलले जात आहे. तसेच दोन्ही कुटुंबांनी हा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने पार पाडण्यावर भर दिला. हा विवाह सोहळा आर्य समाजाच्या परंपरेनुसार संपन्न झाला आणि त्याला कुटुंबीयांसह जवळचा मित्र परिवार उपस्थित होता, असे विकास यादवचे वडील डी. पी. यादव यांनी सांगितले.
विकास यादव याला नितीश कटारा हत्या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. २००२ साली झालेल्या या हत्याकांडाप्रकरणी न्यायालयाने विकास यादव, त्याचा चुलत भाऊ विशाल यादव यांना दोषी ठरवले होते. विकास यादवची बहीण भारती यादव हिच्याशी असलेल्या प्रेमसंबंधांतून ही हत्या झाली होती. या संबंधांना कुटुंबीयांचा विरोध होता. दरम्यान, २२ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्ली हायकोर्टाने आपल्याकडे जामीन वाढवून देण्याचे अधिकार नसल्याचे सांगत विकास यादव याचा अंतरिम जामीन वाढवण्यास नकार दिला होता. त्यानंतर विकास यादव याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच आई आजारी असल्याचे कारण देत जामीन मिळवला होता. या जामीनाचा अवधी आता एका आठवड्याने वाढवण्यात आला आहे.