शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

Video viral : तरुणी म्हणाली 'जय श्रीराम' सर, कन्हैय्या कुमार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 11:36 IST

कर्नाटकमधील कम्युनिष्ट पक्षाचे नेते बीव्ही ककिलाया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंगळुरू येथए युवकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देकर्नाटकमधील कम्युनिष्ट पक्षाचे नेते बीव्ही ककिलाया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंगळुरू येथए युवकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.मुळात माझी उत्पत्तीच दोन व्यक्तींपासून झालेली आहे. माझे आई आणि वडिल जेव्हा एकत्र आले, तेव्हाच माझा जन्म झाला.

बंगळुरू - कम्युनिष्ट पक्षाचे नेते आणि दिल्ली विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांचे एक भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कर्नाटकमधील मंगळुरू येथील एका कार्यक्रमात तरुणीच्या आक्रमक प्रश्नांना कन्हैय्या कुमारने शांतपणे उत्तरे दिली. विशेष म्हणजे, कन्हैय्या कुमारच्या उत्तरावर उपस्थित विद्यार्थ्यांनी कन्हैय्याला दाद दिली. या तरुणीने कन्हैय्याल प्रश्न विचारताना जय श्रीराम असे म्हणून सुरुवात केली होती. त्यावेळी, उपस्थितांनी तिला दाद दिली. 

कर्नाटकमधील कम्युनिष्ट पक्षाचे नेते बीव्ही ककिलाया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंगळुरू येथए युवकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला कन्हैय्या कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी, एका तरुणीने कन्हैय्या कुमारला जय श्रीराम असे म्हणून अनेक प्रश्न विचारले. तसेच, जय हिंद म्हणण्याचीही अपेक्षा व्यक्त केली. तर वन नेशन धोरणाला तुमचा का विरोध आहे, असेही तिने विचारले. या युवतीच्या प्रश्नाला उत्तर देताना, कन्हैय्या कुमारने सुरुवातीला तुमच्याकडे जय श्रीराम तर आमच्याकडे सिताराम असे म्हणत उत्तर दिले. त्यांनंतर, वन नेशन, वन पार्टीबद्दलच्या प्रश्नावरही कन्हैयांनी दिलेल्या उत्तराला सभागृहातील विद्यार्थी दाद देताना दिसले. 

मुळात माझी उत्पत्तीच दोन व्यक्तींपासून झालेली आहे. माझे आई आणि वडिल जेव्हा एकत्र आले, तेव्हाच माझा जन्म झाला. भारताचे एक संविधान 300 पेक्षा जास्त आर्टीकल आहेत. आपल्या देशाच्या संसदेतही दोन सभागृहत आहेत. या सभागृहात देशभरातून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्याही 545 एवढी आहे. आपली लोकशाही ही युनिटी ऑफ डायवर्सिटी या तत्वानुसार चालते, असे म्हणत कन्हैय्या कुमारने युवतीच्या प्रश्नावर उत्तर दिले.दरम्यान, सध्या सोशल मीडियावर कन्हैय्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फेसबुक आणि युट्युबवर या व्हिडीओला लाखो व्ह्युवज मिळत आहेत.  

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारKarnatakकर्नाटकBJPभाजपा