Video: सुसाट कार, राष्ट्रीय महामार्गावर नियंत्रण सुटले आणि...; भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये झाला कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 17:21 IST2026-01-26T17:21:07+5:302026-01-26T17:21:31+5:30

Car Accident Video: राष्ट्रीय महामार्गावरून सुसाट जात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि एक भीषण अपघात घडला. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

Video: Susat car loses control on national highway and...; Horrific accident captured on CCTV | Video: सुसाट कार, राष्ट्रीय महामार्गावर नियंत्रण सुटले आणि...; भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये झाला कैद

Video: सुसाट कार, राष्ट्रीय महामार्गावर नियंत्रण सुटले आणि...; भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये झाला कैद

कार अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. राष्ट्रीय महामार्ग ९३ वर हा भीषण अपघात झाला. महामार्गालगत एक रेस्टॉरंट आहे. तिथून जेवण करून बाहेर पडत असलेल्या तरुणांच्या कारवरच महामार्गावरून जाणारी कार आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव कार दुसऱ्या कारवर धडकल्यानंतर उलटी झाली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. 

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात हा अपघात घडला आहे. एनएच ९३ वर असलेल्या एका रेस्टॉरंट बाहेर एका भरधाव कारने दुसऱ्या कारला धडक दिली. व्हिडीओ समोर आल्यानंतर या अपघाताची तीव्रता दिसली. 

माहितीनुसार, आय१० कार महामार्गावरून वेगात जात होती. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करून तरुण त्यांच्या कारमध्ये बसले. कार रस्त्याच्या कडेला आली. त्याचवेळी वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. 

आय१० कार दुसऱ्या काळ्या रंगाच्या कारवर जोरात आदळते. कारचा वेग इतका होता की, दुसऱ्या कारला धडकल्यानंतर पूर्ण उलटी होते. कारचे चारही चाके हवेत जातात. 

या अपघातात एका तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. तर पाच तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. रेस्टॉरंट बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा अपघात चित्रित झाला आहे. त्यात कारचा वेग आणि अपघातापूर्वी कार कशी नियंत्रणाबाहेर गेली आणि दुसऱ्या काळ्या रंगाच्या कारला धडकली हे दिसत आहे. 

Web Title : तेज़ रफ़्तार कार हाईवे पर दुर्घटनाग्रस्त; सीसीटीवी में कैद भयावह हादसा।

Web Summary : उत्तर प्रदेश में राष्ट्रीय राजमार्ग 93 पर एक तेज़ रफ़्तार कार नियंत्रण खो बैठी और एक रेस्तरां के बाहर दूसरी कार से टकरा गई। इस भीषण टक्कर में एक व्यक्ति की मौत हो गई और पाँच गंभीर रूप से घायल हो गए।

Web Title : Speeding car crashes on highway; horrific accident caught on CCTV.

Web Summary : A speeding car lost control on National Highway 93 in Uttar Pradesh, colliding with another car outside a restaurant. One person died, and five were seriously injured in the violent crash.