ऑफिसमध्ये महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत डीजीपीचा व्हिडीओ व्हायरल; आयपीएसने सांगितले, ती क्लिप खोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 16:42 IST2026-01-19T16:26:16+5:302026-01-19T16:42:28+5:30
बंगळुरू सोने तस्करी प्रकरणातील आरोपी राण्या राव यांचे वडील डीजीपी रामचंद्र राव यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली. डीजीपींनी हा व्हिडीओ मॉर्फ केलेला असल्याचे म्हटले आहे.

ऑफिसमध्ये महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत डीजीपीचा व्हिडीओ व्हायरल; आयपीएसने सांगितले, ती क्लिप खोटी
बंगळुरू सोने तस्करी प्रकरणातील आरोपी राण्या राव यांचे वडील डीजीपी रामचंद्र राव यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली. डीजीपींनी हा व्हिडीओ मॉर्फ केलेला असल्याचे म्हटले आहे.
बंगळुरूमध्ये तैनात असलेले डीजीपी दर्जाचे आयपीएस अधिकारी डॉ. रामचंद्र राव यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक हादरून गेला आहे. व्हिडिओमध्ये अधिकारी आपला अधिकृत गणवेश परिधान करून सरकारी कार्यालयात कर्तव्यावर असताना एका महिलेशी असभ्य वर्तन करताना दिसत आहे. गुप्तपणे रेकॉर्ड केलेल्या फुटेजमध्ये अधिकारी महिलेला मिठी मारताना दिसत आहे.
घटनेनंतर लगेचच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना विभागाकडून सविस्तर माहिती मिळाली. व्हिडीओ पाहिल्यानंतर मुख्यमंत्री संतापले आहेत. सध्या नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे महासंचालक म्हणून कार्यरत असलेले राव यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत.
डीजीपी रामचंद्र राव यांनी हा व्हिडीओ पूर्णपणे मॉर्फ केलेला आणि त्यांना लक्ष्य करण्याचा कट असल्याचे म्हटले आहे. सरकार आता व्हिडिओची सत्यता आणि अनुशासनहीनतेच्या आरोपांची चौकशी करत आहे.
सरकारी कार्यालय आणि वर्दीवर प्रश्न
व्हायरल व्हिडिओमुळेपोलिस विभागातील शिस्त आणि नैतिक मानकांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महिला अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात येत होती, प्रत्येक वेळी ती महिला वेगवेगळा पोशाख परिधान करत होती. महिलांवर जबरदस्तीचा कोणताही आरोप नसला तरी, कर्तव्याच्या वेळेत सरकारी दालनात असे वर्तन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या प्रतिष्ठेचा अपमान मानला जातो.
मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली
या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या या प्रकरणावर खूप संतापले आहेत. अधिकाऱ्याविरुद्ध कडक शिस्तभंगाची किंवा कायदेशीर कारवाईची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.