video: शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव नाही; गडकरींच्या 'त्या' व्हिडिओवरुन काँग्रेसचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 03:26 PM2024-03-01T15:26:15+5:302024-03-01T15:27:52+5:30

काँग्रेसने नितीन गडकरींचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. पाहा...

video: Farmers' crops are not getting good prices; congress shares Nitin Gadkari's video and hits Centre | video: शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव नाही; गडकरींच्या 'त्या' व्हिडिओवरुन काँग्रेसचा घणाघात

video: शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव नाही; गडकरींच्या 'त्या' व्हिडिओवरुन काँग्रेसचा घणाघात


Lok Sabha Elections 2024: गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर एमएसपी(MSP)सह अनेक मागण्यासांठी आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. या व्हिडिओत गडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य भाव मिळत नसल्याचे बोलत आहेत. आता यावरुन काँग्रेसनेभाजपाला घेरण्यास सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत गरीब आणि शेतकऱ्यांच्या दुर्दशेवर भाष्य केले होते. आता काँग्रेस गडकरींचा हा व्हिडिओ भाजपावर टीका करण्याठी वापरत आहे.

काय म्हणाले नितीन गडकरी?
काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नितीन गडकरी म्हणतात की, "आज अनेक ठिकाणी गरीब, मजूर आणि शेतकरी दु:खी आहेत. गावात चांगले रस्ते नाहीत, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही, चांगली रुग्णालये नाहीत, चांगल्या शाळा नाहीत. शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव मिळत नाही." यावरुन आता काँग्रेस केंद्र सरकारवर टीका करत आहे.

यापूर्वीही असे वक्तव्य केले होते
दरम्यान, गडकरींनी यापूर्वीही अशाप्रकारची विधाने केली आहेत. मराठा आंदोलनादरम्यान ते म्हणाले होते की, नोकरी नाही तर आरक्षण घेऊन काय होणार? 2019 च्या निवडणुकीपूर्वी गडकरींच्या या वक्तव्याने जोरदार चर्चा रंगली होती. जानेवारी 2019 मध्ये त्यांनी एका कार्यक्रमात, लोकांना स्वप्ने दाखवणारा नेता आवडतो, असे बोलले होते. गडकरींच्या या विधानाकडे मोदींवर अप्रत्यक्ष हल्ला म्हणून राजकीय वर्तुळात पाहिले जात होते.

Web Title: video: Farmers' crops are not getting good prices; congress shares Nitin Gadkari's video and hits Centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.