Video - काळाचा घाला! दिल्लीच्या करोल बागमध्ये भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, २३ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 10:24 IST2026-03-25T10:23:39+5:302026-03-25T10:24:20+5:30

दिल्लीत एक भीषण बस अपघात झाला आहे. करोल बाग भागातील झंडेवालान मंदिराजवळ मंगळवारी उशिरा रात्री एक 'डबल डेकर' बस पलटली.

Video delhi bus accident near the jhandewalan temple karol bagh area | Video - काळाचा घाला! दिल्लीच्या करोल बागमध्ये भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, २३ जखमी

Video - काळाचा घाला! दिल्लीच्या करोल बागमध्ये भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, २३ जखमी

दिल्लीत एक भीषण बस अपघात झाला आहे. करोल बाग भागातील झंडेवालान मंदिराजवळ मंगळवारी उशिरा रात्री एक 'डबल डेकर' बस पलटली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये ३० प्रवासी होते. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानची ही बस हनुमान मंदिर चौकाजवळ पलटली. या भीषण अपघातात प्रवाशांचं सामान रस्त्यावर विखुरलं असून एकूण २३ प्रवासी जखमी झाले आहेत.

रात्री १ वाजून ८ मिनिटांनी अपघाताचा कॉल आला. अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आलं आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी दोन जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अपघातानंतर क्रेनच्या साहाय्याने बस बाजूला करण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती आणि स्थानिक नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.

हा अपघात किती भीषण होता, याचा अंदाज बसची अवस्था पाहून लावता येतो. बसची समोरील काच पूर्णपणे फुटली असून बाजूच्या खिडक्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. बसच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला असून एक चाकही निखळून बाहेर आलं आहे.

अपघातातील २३ जखमींपैकी १२ प्रवाशांना दिल्लीच्या आरएमएल (RML) रुग्णालयात, १० जणांना गंगा राम रुग्णालयात आणि एकाला लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ही एक 'टूरिस्ट स्लीपर बस' होती, जी जयपूरहून दिल्लीतील फतेहपुरी आणि सदर बाजारच्या दिशेने जात होती. या अपघाताला जबाबदार असलेला बस चालक पंकज कुमार याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावरही एलएचएमसी (LHMC) रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title : दिल्ली: करोल बाग में बस दुर्घटना, दो की मौत, 23 घायल

Web Summary : दिल्ली के करोल बाग में एक डबल डेकर बस पलटने से दो लोगों की मौत हो गई और 23 घायल हो गए। राजस्थान जा रही बस झंडेवालान मंदिर के पास दुर्घटनाग्रस्त हुई। घायलों को अस्पताल पहुंचाया गया और ड्राइवर हिरासत में।

Web Title : Delhi Bus Accident: Two Dead, 23 Injured in Karol Bagh

Web Summary : A double-decker bus accident in Delhi's Karol Bagh killed two and injured 23. The Rajasthan-bound bus overturned near Jhandewalan Temple. Injured passengers were rushed to nearby hospitals and the driver has been taken into custody.