शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे सुप्रीम कोर्टामध्ये होणार आता व्हिडीओ कॉन्फरन्सने सुनावणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 06:21 IST

सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रविवारी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. वकील संघटनांशी चर्चा व तांत्रिक सज्जता करून लवकरच ‘व्हिडीओ’ सुनावणी सुरू होईल

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कामकाज बंद ठेवणे शक्य नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी येत्या काही दिवसांत ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’ने घेण्याचे ठरविले आहे.सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रविवारी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. वकील संघटनांशी चर्चा व तांत्रिक सज्जता करून लवकरच ‘व्हिडीओ’ सुनावणी सुरू होईल. नवी प्रकरणे ‘ई फायलिंग’ पद्धतीने दाखल करण्याची सोयही करण्यात येणार आहे. ही सेवा २४ तास सुरू राहील.न्या. अरुण मिश्रा, न्या. उदय लळित, न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड व न्या. एल. नागेश्वर राव हेही बैठकीस हजर होते. ‘एम्स’चे डॉ. रणदीप गुलेरिया, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे डॉ. बलराम भार्गव यांच्याखेरीज फोर्टिस, अपोलो व मेदान्ता या खासगी इस्पितळांच्या डॉक्टरांकडूनही सल्ला घेण्यात आला.न्या. चंद्रचूड न्यायालयाच्या ‘ई कमिटी’चे प्रमुख आहेत. ‘व्हिडिओ सुनावणी’ घेणे शक्य आहे याची त्यांनी ग्वाही दिली. दोन्ही पक्षकारांचे वकील स्वतंत्र खोल्यांमध्ये व न्यायाधीश कोर्टात किंवा त्यांच्या चेंबरमध्ये बसतील. या तिघांमध्ये ‘व्हिडीओ लिंक’ स्थापन केली जाईल व त्या माध्यमातून सुनावणी होईल. माध्यम प्रतिनिधींनाही वेगळ्या खोलीत बसून ही सुनावणी पाहता/ऐकता येईल.काही उपाय तातडीने सुरूया बैठकीत ठरल्यानुसार काही उपायांची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू करण्यात आली. त्यातील काही असे:प्रवेशांवर नियंत्रण. आत येणाऱ्या प्रत्येकाची तापासाठी तपासणी.गेल्या काही दिवसांत केलेला परदेश प्रवास, घरातील व जवळच्या लोकांचे आजारपण यासह सर्व माहितीचे फॉर्म प्रत्येकाकडून भरून घेणे.न्यायालयात ठिकठिकाणी ‘हॅण्ड सॅनिटायजर’ ठेवणे व स्वच्छतागृहांमध्ये टिश्यू पेपरऐवजी ‘हॅण्ड ड्रायर’चा वापर.प्रत्येकाने काम झाल्यावर न्यायालयात न थांबणे व व्हरांडे आणि आवारात घोळक्याने उभे न राहणे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारतcorona virusकोरोना