राजस्थान सत्तासंघर्षावर पहिल्यांदाच वसुंधराराजेंची प्रतिक्रिया; गेहलोतांना थेट मदतीचा झालेला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 04:04 PM2020-07-18T16:04:59+5:302020-07-18T17:13:11+5:30

Rajasthan Political Crisis: वसुंधरा राजे यांनी गेहलोत सरकार किंवा सचिन पायलट यांच्यातील वादावर एकही शब्द काढलेला नाही. दोन दिवसांपूर्वीच नागौर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हुनमान बेनीवाल यांनी राजेंवर गंभीर आरोप केले होते.

Vasundhara Raje's reaction to the Rajasthan political crisis first time | राजस्थान सत्तासंघर्षावर पहिल्यांदाच वसुंधराराजेंची प्रतिक्रिया; गेहलोतांना थेट मदतीचा झालेला आरोप

राजस्थान सत्तासंघर्षावर पहिल्यांदाच वसुंधराराजेंची प्रतिक्रिया; गेहलोतांना थेट मदतीचा झालेला आरोप

Next

जय़पूर : राजस्थानचेकाँग्रेसने हकालपट्टी केलेले उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या बंडावेळी सत्तास्थापनेसाठी चकार शब्दही न काढणाऱ्या भाजपाच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सचिन पायलट यांचे बंड मोडून काढण्यासाठी राजे यांनीच गेहलोतांना रसद पुरविल्याचा आरोप पायलटांसह एनडीएच्या खासदारानेही केला होता. यामुळे वसुंधरा राजेंना आता बोलावे लागल्याची चर्चा रंगू लागली आहे. 


वसुंधरा राजे यांनी ट्विट करून यावर वक्तव्य केले आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे राज्यातील जनतेला नुकसान भोगावे लागत आहे. हे दुर्भाग्याचे असल्याचे राजे यांनी म्हटले आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा राजस्थानमध्ये कोरोनामुळे 500 हून अधिक बळी गेले आहेत, तर 28000 हून अधिक लोक बाधित झाले आहेत. याचबरोबर राज्यातील शेती टोळधाडीमध्ये नष्ट होत आहे. महिलांविरोधातील अत्याचारांनी सीमा ओलांडली आहे. राज्यामध्ये विजेचा मोठा प्रश्न आहे. या मोठ्या यादीपैकी काहीच समस्या आहेत. सरकारला याकडे लक्ष द्यायला हवे, कधीतरी लोकांचा विचार करा, असा टोला त्यांनी लगावला आहे.  


मात्र, वसुंधरा राजे यांनी गेहलोत सरकार किंवा सचिन पायलट यांच्यातील वादावर एकही शब्द काढलेला नाही. दोन दिवसांपूर्वीच नागौर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हुनमान बेनीवाल यांनी राजेंवर गंभीर आरोप केले होते. बेनिवास यांनी सांगितले की, वसुंधराराजेंमुळेच गेहलोत सरकारची बुडणारी नौका पुन्हा तरंगू लागली आहे. बेनिवाल यांनी या आधीही वसुंधरा राजेंवर कोमतीही भीडभाड न ठेवता आरोप केले आहेत. बेनिवाल यांनी ट्विटरवर एका पाठोपाठ एक ट्विट करत भाजपाच्या दिग्गज नेत्या राजस्थानमधील काँग्रेस सरकार वाचविण्यासाठी आमदारांना फोन करत असल्याचा आरोप केला आहे. 


वसुंधरा यांचा प्रभाव एवढा आहे की, त्यांच्या सूचनेवरून पायलट यांच्या बंडखोरीच्या बाजुने असलेले आमदार पुन्हा माघारी जात आहेत. बेनिवाल यांनी #गहलोत_वसुंधरा_गठजोड़ असा हॅशटॅग करत हे आरोप केले आहेत. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या अशोक गेहलोत यांचे अल्पमतात आलेले सरकार वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. राजे यांनी काँग्रेसच्या अनेक आमदारांना स्वत: फोन करून माघारी फिरण्यास सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे बेनिवाल यांनी या ट्विटमध्ये गृह मंत्री अमित शहा, त्यांचे ऑफिस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, राजस्थान भाजपा यांना टॅग केले आहे. यामध्ये सीकर आणि नागौर जिल्ह्यातील दोन जाट आमदारांना त्यांनी पायलट यांच्यापासून दूर राहण्यास सांगितले. याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असेही बेनिवाल यांनी म्हटले होते. यावरही वसुंधरा राजे यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. 

अन्य महत्वाच्या बातम्या....

ब्रिटन गेमचेंजर ठरणार! मृत्यूच्या दाढेतील कोरोनाबाधितांना वाचविले; स्टेरॉईडची चाचणी यशस्वी

चीन चवताळला! दक्षिण समुद्रात घुसलेल्या अमेरिकेला दिले चोख प्रत्यूत्तर

Sarkari Nokari : लेखी परीक्षेचे टेन्शन नाही! फक्त मुलाखतीवर बँकेसह या विभागांत सरकारी नोकऱ्यांची संधी

चीन चवताळला! दक्षिण समुद्रात घुसलेल्या अमेरिकेला दिले चोख प्रत्यूत्तर

लॉकडाऊनमध्ये भविष्याची चिंता; लोकांची या सरकारी योजनेकडे 'उडी', तुम्हीही विचार करा...

अखेर पॉझिटिव्ह बातमी आली! सीरम इन्स्टिट्यूटला मोठा दिलासा; ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी यशस्वी

हेल्थ इन्शुरन्समध्ये मोठे बदल झाले; कोरोना काळात जाणून घेणे महत्वाचे

स्वत:चा पेट्रोलपंप खोला, बंपर कमाई करा; Reliance Jio 3500 नवे पेट्रोल पंप वाटणार

ब्रेझा, व्हेन्यूला विसरणार; नवी एसयुव्ही Magnite पाहताच भले भले व्वा म्हणणार

छप्पर फाडके! दुकानदाराने चुकीचे तिकिट दिले; वृद्धाला लागली 15 कोटींची लॉटरी

चिनी स्मार्टफोन नकोय? सॅमसंगने स्वस्त Galaxy M01s लाँच केला; जाणून घ्या किंमत

Read in English

Web Title: Vasundhara Raje's reaction to the Rajasthan political crisis first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.