ब्रेझा, व्हेन्यूला विसरणार; नवी एसयुव्ही Magnite पाहताच भले भले व्वा म्हणणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 05:58 PM2020-07-16T17:58:41+5:302020-07-16T20:08:47+5:30

निसानच्या या छोट्या एसयुव्हीची किंमत 5.25 लाख रुपयांपासून सुरु होण्याची शक्यता आहे.

forget Breeza, venue; new Nissan SUV Magnite showcased worldwide today | ब्रेझा, व्हेन्यूला विसरणार; नवी एसयुव्ही Magnite पाहताच भले भले व्वा म्हणणार

ब्रेझा, व्हेन्यूला विसरणार; नवी एसयुव्ही Magnite पाहताच भले भले व्वा म्हणणार

googlenewsNext

Nissan ने बहुप्रतिक्षित सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही Nissan Magnite वरून पडदा हटविला आहे. कंपनीने या एसयुव्हीचे कॉन्सेप्ट व्हर्जन दाखविले आहे. ही Nissan Magnite 2021 च्या सुरुवातीला लाँच केली जाणार आहे. ही भारतीय बाजारातील सर्वात छोटी आणि सर्वात स्वस्त एसयुव्ही ठरणार आहे. 


निसान मैग्नाइट CMF-A+ मॉड्यूलर प्लॅटफॉर्म वापरण्यात आला आहे. याचा वापर रेनॉल्ट ट्रायबरमध्ये करण्य़ात आला आहे. रेनॉल्टची येणारी सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही (Renault HBC )याच प्लॅटफॉर्मवर बांधण्यात आलेली असणार आहे. या मॅग्नाईट एसयुव्हीमध्ये 1.0 लीटर, तीन सिलेंडरचे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन मिळणार आहे. जे 99bhp ची ताकद आणि 160Nm टॉर्क तयार करणार आहे. याशिवाय यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT अॅटोमॅटीक गिअरबॉक्स मिळणार आहे. दुसरे इंजिन 1.0 लीटरचेच परंतू 3-सिलिंडर टर्बो-पेट्रोल इंजिन असणार आहे. जे  95hp ची ताकद दोणार आहे. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि सीव्हीटी गिअरबॉक्सचा पर्याय असण्याची शक्यता आहे. 


खरेतर ही कार डॅटसन ब्रँडमध्ये लाँच करण्यात येणार होती. त्यामुळे या कारचे फ्रंट स्टायलिंग डॅटसनच्या कारसारखे आहे. कंपनीची डॅटसन बंद करण्याची योजना असल्याने निसानच्या मुख्य ब्रँड अंतर्गत ही एसयुव्ही आणण्यात आली आहे. मॅग्नाईट ही हाय एंड फिचरने युक्त असणार आहे. याचे एलईडी हेडलँप, टेललँप, पॅनारोमिक सनरुफ, 360 डिग्री सराऊंड व्ह्यू कॅमेरा, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम आणि क्रूझ कंट्रोलसारखे फिचर असणार आहेत. 


किंमत किती असेल? 
निसानच्या या छोट्या एसयुव्हीची किंमत 5.25 लाख रुपयांपासून सुरु होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर सीव्हीटीसह टर्बो-पेट्रोल इंजनच्या मॉडेलची किंमतही 6 लाखांच्या आसपास ठेवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यामुळे छोट्या एसयुव्हींच्या सेगमेंटमध्ये ही सर्वात स्वस्त एसयुव्ही ठरण्याची शक्यता आहे. या एसयुव्हीची टक्कर मारुतीच्या ब्रेझा, टाटाच्या नेक्सॉन, ह्युंदाईच्या व्हेन्यू, महिंद्राच्या एक्सयुव्ही 300 आणि कियाच्या सोनेटसोबत होणार आहे. 


केव्हा लाँचिंग?
ही एसयुव्ही ऑगस्ट 2020 मध्येच लाँच होणार होती. मात्र, या कोरोनामुळे या कारची लाँचिंग टाळण्य़ात आले. आता ही एसयुव्ही 16 जुलैला जगासमोर आणण्यात येणार असली तरीही ती 2021 मध्येच भारतात लाँच केली जाण्याची शक्यता आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

स्वत:चा पेट्रोलपंप खोला, बंपर कमाई करा; Reliance Jio 3500 नवे पेट्रोल पंप वाटणार

हेल्थ इन्शुरन्समध्ये मोठे बदल झाले; कोरोना काळात जाणून घेणे महत्वाचे

अमित शहा, हात जोडते! सुशांतच्या आत्महत्येचा सीबीआय तपास करा; प्रेयसी रिया चक्रवर्तीची मागणी

छप्पर फाडके! दुकानदाराने चुकीचे तिकिट दिले; वृद्धाला लागली 15 कोटींची लॉटरी

चिनी स्मार्टफोन नकोय? सॅमसंगने स्वस्त Galaxy M01s लाँच केला; जाणून घ्या किंमत

कुठेय लॉकडाऊन; कुठेय मंदी! भारतातल्या सर्वांत महागड्या फ्लॅटची खरेदी; किंमत पाहून हादराल

Reliance AGM 2020: कोरोना लसीवर नीता अंबानींची मोठी घोषणा; इतिहासात पहिल्यांदाच भाषण

बापरे! अवघ्या 10 वर्षांच्या मुलाने बँकेतून 30 सेकंदांत 10 लाख रुपये उडविले; सीसीटीव्ही पाहून पोलीस हादरले

...तर 2 अब्जांनी पृथ्वीवरील लोकसंख्या कमी होईल; कोरोना महामारीनंतर मोठा इशारा

...तेव्हा सुशांत कुठे होता? मोदी भेटीवरून भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल

Web Title: forget Breeza, venue; new Nissan SUV Magnite showcased worldwide today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.