आहेरवाडीत सोमवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:27+5:302015-01-23T23:06:27+5:30

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील पंचलिंगेश्वर देवस्थान कळसारोहण व लक्ष दीपोत्सव रंभापुरी जगद्गुरूंच्या हस्ते होणार असून, यानिमित्त 26 जानेवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

Various religious programs since Monday in Aherawadi | आहेरवाडीत सोमवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम

आहेरवाडीत सोमवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम

लापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील पंचलिंगेश्वर देवस्थान कळसारोहण व लक्ष दीपोत्सव रंभापुरी जगद्गुरूंच्या हस्ते होणार असून, यानिमित्त 26 जानेवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
सोमवारी 26 जानेवारी रोजी अड्डपालखी महोत्सव, 27 ते 29 जानेवारी या कालावधीत रंभापुरी जगद्गुरूंची इष्टलिंग महापूजा, सायंकाळी 6 वा. धर्मसभा होणार आहे. 29 ते 30 जानेवारी या कालावधीत गंगा, गणपती, नवग्रह, पंचकलश, उमा-महेश्वर, रुद्रयाग, होमहवन कार्यक्रम होणार आहेत. या दिवशी दीक्षा व अय्याचार कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. कळसारोहण व सायंकाळी 6 वा. लक्ष दीपोत्सव होणार आहे. यावेळी डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, शिवयोगी शिवाचार्य, शांतलिंगेश्वर शिवाचार्य, पंचाक्षरी शिवाचार्य, रेणुक शिवाचार्य, र्शीकंठ शिवाचार्य, डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य, राजशेखर हिरेमठ उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Various religious programs since Monday in Aherawadi