हवेत असतानाच झाला मोठा बिघाड, उत्तराखंडच्या राज्यपालांच्या हेलिकॉप्टरचं आपातकालीन लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 16:43 IST2026-03-08T16:41:59+5:302026-03-08T16:43:39+5:30

Uttarakhand Governor's helicopter makes emergency landing: उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टिनंट जनरल गुरमीत सिंग (निवृत्त) यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या तांत्रिक बिघाडामुळे सिंग यांच्या हेलिकॉप्टरला आणीबाणीच्या परिस्थितीत पौडी गढवालमधील श्रीनगर येथे उतवावं लागलं.

Uttarakhand Governor's helicopter makes emergency landing after major mid-air malfunction | हवेत असतानाच झाला मोठा बिघाड, उत्तराखंडच्या राज्यपालांच्या हेलिकॉप्टरचं आपातकालीन लँडिंग

हवेत असतानाच झाला मोठा बिघाड, उत्तराखंडच्या राज्यपालांच्या हेलिकॉप्टरचं आपातकालीन लँडिंग

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना ताजी असतानाच आज उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टिनंट जनरल गुरमीत सिंग (निवृत्त) यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या तांत्रिक बिघाडामुळे सिंग यांच्या हेलिकॉप्टरला आणीबाणीच्या परिस्थितीत पौडी गढवालमधील श्रीनगर येथे उतवावं लागलं.

पोलिसांनी दिलेला माहितीनुसार हवेत उड्डाण करत असतानाच या हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिग करण्याचा निर्णय घेण्यात आला. हेलिकॉप्टरच्या पायलटने प्रसंगावधान राखत निर्णय घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.

त्यानंतर या हेलिकॉप्टरला श्रीनगर गढवालमधील जीव्हीके हेलिपॅडवर उतरवण्यात आले. तसेच रज्यपाल गुरमीत सिंग यांना श्रीनगर येथील पोलीस गेस्ट हाऊसमध्ये नेण्यात आले.  

Web Title : उत्तराखंड के राज्यपाल के हेलीकॉप्टर की तकनीकी खराबी के कारण आपातकालीन लैंडिंग

Web Summary : उत्तराखंड के राज्यपाल के हेलीकॉप्टर में हवा में तकनीकी खराबी आ गई, जिसके कारण पौड़ी गढ़वाल के श्रीनगर में आपातकालीन लैंडिंग करनी पड़ी। पायलट की सूझबूझ से संभावित आपदा टल गई। राज्यपाल गुरमीत सिंह को सुरक्षित रूप से पुलिस गेस्ट हाउस ले जाया गया।

Web Title : Uttarakhand Governor's helicopter makes emergency landing due to technical snag.

Web Summary : Uttarakhand Governor's helicopter experienced a technical malfunction mid-air, forcing an emergency landing in Srinagar, Pauri Garhwal. The pilot's quick thinking averted a potential disaster. Governor Gurmeet Singh was safely taken to a police guest house.