धक्कादायक प्रकार; जळत्या होळीत तरुणाने मारली उडी, पुढे...पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 13:05 IST2026-03-05T13:04:16+5:302026-03-05T13:05:17+5:30
Uttar Pradesh : या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

धक्कादायक प्रकार; जळत्या होळीत तरुणाने मारली उडी, पुढे...पाहा Video
Uttar Pradesh : देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा झाला. मात्र, याच सणादरम्यान उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. होलिका दहन सुरू असताना एका तरुणाने अचानक जळत्या होलिकेत उडी घेतली. सुदैवाने, ग्रामस्थांनी धाडस दाखवत त्या तरुणाला तात्काळ बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून परिसरात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.
नंदरौली गावातील घटना
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना नंदरोली गावातील आहे. बुधवारी रात्री गावात पारंपरिक पद्धतीने होलिका दहन सुरू होते. या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. जळत्या होलिकेभोवती लोक परिक्रमा करत होते. याच दरम्यान एक तरुण दारूच्या नशेत त्या ठिकाणी आला आणि अचानक जळत्या होलिकेच्या अगदी मध्यभागी जाऊन उभा राहिला. सुरुवातीला लोकांना तो आगीच्या इतक्या जवळ कसा गेला हेच समजले नाही.
A shocking sight amid the Holika Dahan in Sambhal. A man stood amidst the flames of fire. The crowd fell silent... a few seconds of terror. Then a young man showed courage. He was pulled out, and the incident was averted. pic.twitter.com/r6uxkNIfa0
— Oxomiya Jiyori 🇮🇳 (@SouleFacts) March 5, 2026
ग्रामस्थांनी दाखवले धाडस
काही क्षणातच आजूबाजूच्या लोकांचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि परिसरात गोंधळ उडाला. घटनेची गंभीरता लक्षात घेत काही ग्रामस्थांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत त्या तरुणाला आगीच्या मध्यातून ओढून बाहेर काढले. थोडासा उशीर झाला असता तर मोठा अपघात घडू शकला असता. तरुणाला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
छतांवरून लोकांनी दिली सूचना
घटना घडत असताना आसपासच्या घरांच्या छतांवर उभ्या असलेल्या लोकांनीही हा प्रकार पाहिला. त्यांनी मोठ्याने ओरडून खाली उभ्या लोकांना सावध केले. याच दरम्यान उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने संपूर्ण प्रकाराचा मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. सुदैवाने ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे तरुणाचा जीव वाचला आणि मोठा अपघात टळला.