शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 13:11 IST

उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये बकरी ईदनिमित्त एका व्यक्तीने बकरीची कुर्बानी देण्याऐवजी स्वतःचे बलिदान दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

UP Crime: देशभरात शनिवारी मुस्लिम समाजाकडून विविध ठिकाणी नमाज अदा करुन बकरी ईद साजरी करण्यात आली. बकरी ईदच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातून मात्र एक हादरवणारा प्रकार समोर आला. देवरिया जिल्ह्यात शनिवारी ईद-उल-अजहाची नमाज अदा केल्यानंतर एका ६० वर्षीय व्यक्तीने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. आवाज ऐकून कुटुंबियांनी वृद्धाला गोरखपूर येथील बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये नेले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांना तिथे एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये आत्महत्या करण्यामागचे कारण लिहिण्यात आलं आहे.

देवरिया जिल्ह्याच्या गौरी बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उधोपूर गावात ही घटना घडली. शनिवारी बकरी ईदच्या दिवशीच ईश मोहम्मद नावाच्या व्यक्तीने स्वतःचा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. स्वतःवर चाकूने हल्ला केल्यानंतर तो त्याच्या झोपडीतील खाटेवर पडून होतो. गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली ज्यामध्ये ईश मोहम्मदने मी अल्लाहच्या पैगंबरासाठी स्वतःची कुर्बानी दिली आहे, असं लिहीलं होतं. ईश मोहम्मद शुक्रवारी, आंबेडकर नगरमधील सुलतान सय्यद मखदूम अशरफ शाह यांच्या दर्ग्यावरून परतला होता, असं त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.

कुटुंबियांना जेव्हा ईश मोहम्मद यांच्या ओरडण्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी झोपडीत जाऊन पाहिलं. त्यावेळी ईश यांच्या गळ्यातून रक्त वाहत होती. ईश मोहम्मद यांनी सकाळी मशिदीत नमाज अदा केली. सकाळी १० वाजता ते घरी परतले तेव्हा तो थेट घराशेजारी बांधलेल्या झोपडीत गेले. तासाभरानंतर आम्हाला त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. आम्ही घटनास्थळी गेलो तेव्हा आम्हाला दिसले की त्यांच्या गळ्यातून रक्त वाहत होते. झोपडीत जमिनीवर सर्वत्र रक्त पसरलेले होते आणि जवळ एक चाकू पडलेला होता, असं त्यांच्या पत्नीने म्हटलं.

ईश यांना पाहून त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केला आणि शेजारच्यांना बोलावून आणलं. शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून इश मोहम्मदला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. त्यांची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलवले. तिथे उपचारादरम्यान ईश यांचा मृत्यू झाला. यावेळी ईश यांच्या मुलाने वडिलांबाबत माहिती दिली. उपचारादरम्यानही वडील विचित्र वागत होते. मी त्यांच्या जवळ गेलो तेव्हा त्यांनी मला लाथ मारून हाकलून दिले. वडिलांची मानसिक स्थिती ठीक नव्हती, असं अहमदने सांगितले.

"सकाळपर्यंत सगळं ठीक होतं. माझा नवरा आंघोळ करून सकाळी ७ वाजता नमाज पठण करायला गेला होता. मशिदीतून परतल्यानंतर त्याने प्रार्थना केली. तो म्हणाला की तो सर्वांसोबत बसून जेवेल. त्यानंतर तो एकटाच बसला. मी जेवण बनवत होते. मी तीन वेळा त्याला भेटायला गेलो आणि तो एकटाच बसला होता. मी चौथ्यांदा त्याला भेटायला गेलो तेव्हा तो खाटेवर पडलेला होता. त्याचा गळा कापला होता," असं ईश मोहम्मद यांच्या पत्नीने सांगितले. 

सुसाईड नोटमध्ये काय म्हटलं?

""एक माणूस आपल्या मुलासारखा बकरा पाळतो आणि नंतर त्याची कुर्बानी देतो. तो देखील एक जिवंत प्राणी आहे. खरी कुर्बानी तिच आहे जो माणूस स्वतः देतो. मी अल्लाहच्या पैगंबराच्या नावाने स्वतःचे बलिदान देत आहे. मला कोणीही मारले नाही. मला शांतपणे दफन करा. कोणाचीही भीती बाळगू नका," असं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :Bakri Eidबकरी ईदCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस