Uttar Pradesh Crime: यूपीच्या कौशांबी जिल्ह्यात गुंडगिरीची एक अत्यंत भयावह घटना समोर आली आहे. एका टोळक्याने तरुणाला कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. तरुण कसाबसा जीव वाचवून पळाला, मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करत पकडले आणि ओव्हरब्रिजवरून खाली फेकले. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.
फिल्मी स्टाइलने हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, संदीपन घाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पल्हाना घाट गावात ही धक्कादायक घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या सहापेक्षा अधिक तरुणांनी गावातील एका युवकाचा पाठलाग केला. त्याला पकडून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
ओव्हरब्रिजवरून फेकले
हल्लेखोरांनी तरुणाला इतके मारले की, तो गंभीर जखमी झाला. त्याने जीव वाचवण्यासाठी कसाबसा पळ काढला, मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करत पकडले आणि चक्क महामार्गावरील ओव्हरब्रिजवरून खाली फेकले. या घटनेत पीडित तरुणाचे दोन्ही पाय आणि जबडा तुटला असून, त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
कुटुंबाचा आक्रोश, पोलिसांची कारवाई
पीडित तरुणाचे नाव दिनेश सरोज असे आहे. तर, सोनू पटेल आणि रवि साहू यांनी आपल्या चार-पाच अज्ञात साथीदारांसह दिनेशवर हल्ला केल्याचा आरोप आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दिनेशचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमी दिनेशला तातडीने मूरतगंज प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात रेफर केले.
गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Web Summary : In Uttar Pradesh, a young man was brutally beaten and thrown from an overbridge by a gang. He suffered severe injuries, including broken legs and a jaw. Police are investigating the incident and searching for the accused.
Web Summary : उत्तर प्रदेश में एक युवक को बेरहमी से पीटा गया और ओवरब्रिज से फेंक दिया गया। उसे गंभीर चोटें आईं, जिसमें पैर और जबड़ा टूटना शामिल है। पुलिस मामले की जांच कर रही है और आरोपियों की तलाश जारी है।