शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशच्या राज्यपालांचा राजीनामा

By admin | Updated: June 17, 2014 17:11 IST

केंद्रात सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारने काँग्रेसप्रणीत युपीए सरकारच्या कालावधीत नेमलेल्या सहा राज्यपालांना हटवण्यासाठी कंबर कसली असून आत्तापर्यंत उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी राजीनामा दिला आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १७ - केंद्रात सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारने काँग्रेसप्रणीत युपीए सरकारच्या कालावधीत नेमलेल्या सहा राज्यपालांना हटवण्यासाठी कंबर कसली असून आत्तापर्यंत उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी राजीनामा दिला आहे. उत्तरप्रदेशचे राज्यपाल बी.एल. जोशी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार होता. त्यानंतर काही वेळाने कर्नाटकचे राज्यपाल हंसराज भारद्वाज यांनीही राजीनामा दिल्याचे समजते. आसामचे राज्यपाल जे.बी.पटनायक यांनीही राजीनामा दिल्याचे वृत्त होते, मात्र त्यांनी अद्याप राजीनामा दिला नल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. आता राजस्थानचे राज्यपालही राजीनामा देण्याची शक्‍यता आहे. 
 
केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी काँग्रेसने नेमलेल्या सहा राज्यपालांशी संपर्क साधून त्यांना राजीनामा द्यायला सांगितला होता. या सहा राज्यपालांमध्ये पश्चिम बंगालचे एम.के.नारायणन, केरळाच्या शीला दीक्षीत, राजस्थानच्या मार्गारेट अल्वा, गुजरातच्या कमला बेनीवाल, त्रिपूराचे देवेंद्रकुवर आणि महाराष्ट्राचे के. शंकरनारायणन यांचा समावेश होता. मात्र या सर्वांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याचे समजते. 
साधारणतः राज्यपालांच्या नियुक्तीचा कालावधी पाच वर्ष असतो. राज्यपालांना मुदत संपण्यापूर्वी स्वेच्छेने राजीनामा देता येतो किंवा केंद्र सरकार त्यांना बरखास्त करु शकते. मोदी सरकार राज्यपालांना हटवण्याचा निर्णयावर ठाम असून केंद्रीय मंत्रिमंडळ तसा प्रस्ताव मंजूर करुन राष्ट्रपतींकडेही पाठवणार आहे.त्यामुळे आता राष्ट्रपती याविषयी काय भूमिका घेतात याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. 
राज्यपालांना हटवण्याचा निर्णय पूर्णत्वास नेणे सोपे नाही. हे प्रकरण कोर्टापर्यंतही जाऊ शकते. मात्र राज्यपालांना हटवण्यासाठी आमच्याकडे असंख्य कारणं आहेत असे गृहखात्यातील सूत्रांनी सांगितले. २००४ मध्ये सत्तेवर आल्यावर यूपीए सरकारनेही भाजपने नेमलेल्या राज्यपालांना हटवले होते. त्यावेळीदेखील एका राज्यपालाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे हा निर्णय मार्गी लावणे मोदी सरकारसाठी कठीण असून हे प्रकरण कोर्टातही जाऊ शकते असे जाणकारांनी सांगितले.