Youtuber Mohammad Kaif Death: अति तेथे माती ही म्हण प्रत्येकाला लहानपणीच शिकवली जाते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असे अनुभवी माणसे सांगताना दिसतात. तरुणी पिढी त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करते. पण काही वेळा त्यातूनच खूप मोठे नुकसानही होऊ शकते. असाच एक प्रसंग भारतात घडला आहे. मोबाईल गेमिंगचे व्यसन किती जीवघेणे ठरू शकते याचे एक भयानक उदाहरण मेरठमध्ये पाहायला मिळाले. गाझियाबादमध्ये तीन बहिणींच्या आत्महत्येनंतर, आता मेरठच्या खैरनगर भागात PUBG च्या व्यसनाने मोहम्मद कैफ या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत गेम खेळत असताना, तरुणाचा रक्तदाब इतका वाढला की त्याला ब्रेन हॅमरेज झाले आणि त्याचा मृत्यू झाला.
नेमका प्रकार काय?
मेरठमधील खैरनगर गुलर वाली गली येथील रहिवासी असलेल्या प्रॉपर्टी डीलर फारुकचा एकुलता एक मुलगा मोहम्मद कैफ (२२) शुक्रवारी रात्री त्याच्या खोलीत हेडफोन लावून मोबाईल फोनवर PUBG खेळत होता. कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, कैफला गेल्या चार महिन्यांपासून ऑनलाइन गेमिंगचे वेड लागले होते. शुक्रवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास तो गेम खेळत असताना अचानक बेडवरून खाली पडला. जेव्हा कुटुंब खोलीत पोहोचले, तेव्हा कैफची प्रकृती गंभीर होती. त्याला ताबडतोब स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याचा रक्तदाब ३०० पेक्षा जास्त असल्याचे पाहून डॉक्टरही थक्क झाले.
उपचारादरम्यान मृत्यू
मोहम्मद कैफची प्रकृती गंभीर पाहून डॉक्टरांनी त्याला ताबडतोब दिल्लीला हलवण्यास सांगितले. दिल्लीतील रुग्णालयात दोन दिवस त्याने आयुष्याशी झुंज दिल्यानंतर अखेर कैफचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मते, त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक ताण आणि उत्साहामुळे त्याचा रक्तदाब इतका वाढला की, ज्यामुळे त्याला ब्रेन हेमरेज (मेंदूतील रक्तवाहिनी फुटणे) झाले आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला.
आधी रीलचे व्यसन, मग गेमिंगचे वेड
मोहम्मद कैफचे वडील फारुक यांनी जड अंतःकरणाने सांगितले की त्यांच्या मुलाला पूर्वी सोशल मीडियावर रील बनवण्याची आवड होती. रील बनवणे हे जणू त्याचे व्यसनच होते. परंतु गेल्या काही महिन्यांत त्याला PUBG चे इतके व्यसन लागले होते की तो दिवस आणि रात्र गेम खेळण्यात घालवत असे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याला वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते त्याच्या गेमिंगच्या वेडेपणाला आवर घालू शकले नाहीत.
Web Summary : A 22-year-old in Meerut died from a brain hemorrhage due to excessive PUBG gaming. He played day and night, causing dangerously high blood pressure, leading to his tragic death. Family tried to intervene.
Web Summary : मेरठ में 22 वर्षीय युवक की अत्यधिक PUBG गेमिंग के कारण ब्रेन हैमरेज से मौत हो गई। वह दिन-रात खेलता था, जिससे उसका रक्तचाप खतरनाक रूप से बढ़ गया, जिसके कारण उसकी दुखद मृत्यु हो गई। परिवार ने हस्तक्षेप करने की कोशिश की।