भाजप व्होट बँकेच्या राजकारणाला घाबरत नाही, अमित शाहंचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 05:30 PM2021-08-01T17:30:39+5:302021-08-01T17:32:50+5:30

"योगी सरकारमध्ये महिला सुरक्षित आहेत. त्या आधी नव्हत्या. उत्तर प्रदेशात नेहमीच दंगली व्हायच्या, मात्र, आता दंगली होत नाहीत. योगींनी राज्यात कायद्याचे राज्य कामय केले."

Uttar pradesh BJP Leader Amit shah says BJP is not afraid of vote bank politics and slammed the opposition | भाजप व्होट बँकेच्या राजकारणाला घाबरत नाही, अमित शाहंचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले...

भाजप व्होट बँकेच्या राजकारणाला घाबरत नाही, अमित शाहंचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले...

Next

मिर्झापूर - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज एक दिवसीय उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. मिर्झापूर येथे बोलताना ते म्हणाले, यापूर्वी व्होट बँकेच्या राजकारणामुळे अनेक कामे झाली नाहीत. मात्र, भाजप व्होट बँकेच्या राजकारणाला घाबरत नाही. बऱ्याच दिवसांनंतर उत्तर प्रदेशात आलो आहे. पण जेव्हा केव्हा येतो, तेव्हा घरी आल्यासारखे वाटते. याच उत्तर प्रदेशने 2014, 2017 आणि 2019 मध्ये संपूर्ण बहुमताचे सरकार दिले आहे. (Uttar pradesh BJP Leader Amit shah says BJP is not afraid of vote bank politics and slammed the opposition )

उत्तर प्रदेशची अपेक्षा आणि आवश्यकता काय आहेत, हे मोदी जींना पूर्णपणे माहीत आहे. 550 वर्षांपासून रखडून पडलेल्या राम मंदिराची सुरुवात मोदीजींनी केली. भाजप सरकारने प्रत्येक परंपरा जिवंत केली आहे. आपल्या आस्थेचा सन्मान का होत नाही, असा प्रश्न लोक करत होते. विरोधकांवर हल्ला चढवताना शाह म्हणाले, माझा प्रश्न आहे, राम मंदिर का बांधण्यात आले नाही? विंध्यवासिनीचे काम का झाले नाही?

"हम दो, हमारे दो की सरकार", राहुल गांधींनी मोदींना दिल्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा; शेअर केला 'हा' खास Video

तत्पूर्वी शाह यांनी, विंध्याचलमध्ये विंध्यवासिनी मंदिरात पूजा केली. याच बरोबर, आज सकाळी अमित शाह यांनी लखनौ येथे फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाचे भूमिपूजन केले. यावेळी विरोधकांवर निशाणा साधताना, निवडणुका आल्या, की सक्रीय होणाऱ्या नेत्यांची सर्वात जास्त संख्या उत्तर प्रदेशातच आहे, असे ते म्हणाले. यावेळी योगी सरकारचे कौतुक करताना ते म्हणाले, योगी सरकारमध्ये महिला सुरक्षित आहेत. त्या आधी नव्हत्या. उत्तर प्रदेशात नेहमीच दंगली व्हायच्या, मात्र, आता दंगली होत नाहीत. योगींनी राज्यात कायद्याचे राज्य कामय केले.

वाराणसीलाही भेट -
आपल्या एक दिवसीय युपी दौऱ्यात शाह वाराणसीलाही जाणार आहेत. ते तेथे सायंकाळी भगवान विश्वनाथ मंदिरातही दर्शन घेतील. यानंतर ते बाबतपूर एअरपोर्टवरून दिल्लीकडे रवाना होतील. अमित शाह यांच्या वाराणसी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिक्योरिटी टाइट करण्यात आली आहे.

Web Title: Uttar pradesh BJP Leader Amit shah says BJP is not afraid of vote bank politics and slammed the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.