भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 20:24 IST2025-12-10T20:24:19+5:302025-12-10T20:24:58+5:30
अपघातानंतर, शेतात काम करत असलेल्या ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवत तपास सुरू केला आहे.

भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे बुधवारी पूर्वांचल एक्सप्रेसवेवर सकाळच्या सुमारास भीछ कारअपघात झाला. येथील कुडवा गावाजवळ नियंत्रण सुटलेल्या एका कारने समोर उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक एवढे जोरदार होती की, दोन्ही कारने पेट घेतला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही कारमधील काही लोक जखमी झाले आहेत. एका मुलीची प्रकृती अद्यापही गंभीर आहे.
अपघातानंतर, शेतात काम करत असलेल्या ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवत तपास सुरू केला आहे.
येथील कुडवा गावाजवळ भरधाव ब्रेझा कारने उभ्या असलेल्या वॅगनआरला धडक दिली आणि क्षणात दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. ब्रेझामध्ये तीन महिला आणि एक मुलगी होते. यांपैकी एका मुलीची प्रकृती गंभीर आहे. तर वॅगनआरमध्ये तीन मुली, एक महिला आणि एक पुरुष स्वार होते. या अपघातात एक महिला आणि एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर 6 आणि 7 वर्षांच्या दोन मुलींना उपचारासाठी सीएचसी हैदरगड येथे पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
यासंदर्भात माहिती देताना प्रत्यक्षदर्शी दीपक यांनी सांगितले की, “आम्ही शेतात काम करत होतो, अचानक भरधाव वेगाने आलेल्या एका कारने दुसऱ्या कारला जोरात धडक दिली. यानंतर दोन्ही कारने पेट घेतला. आम्ही पळत जाऊन लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
हैदरगड येथील सरकारी आरोग्य केंद्रात पाच जणांना मृत घोषित करण्यात आले असून, पाच गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. यांपैकी एकाची स्थिती अधिक गंभीर असल्याने त्याला राममनोहर लोहिया रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.