शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी ड्रोन अन् हेलिकॉप्टरचा वापर; बारामुल्लात ३ दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 06:43 IST

चौथ्या दिवशी चकमक, अनंतनागमध्ये शनिवारी पुन्हा हल्ले सुरू होताच सुरक्षा दलांनी जंगलाच्या दिशेने तोफांचा  मारा केला

श्रीनगर : अनंतनाग जिल्ह्याच्या घनदाट जंगलातील अतिरेक्यांचा बीमोड करण्याची मोहीम शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. दहशतवाद्यांना शोधून ठार करण्यासाठी ड्रोन व हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे. दुसरीकडे बारामुल्ला जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. 

अनंतनागमध्ये शनिवारी पुन्हा हल्ले सुरू होताच सुरक्षा दलांनी जंगलाच्या दिशेने तोफांचा  मारा केला. त्यानंतर सुरक्षित ठिकाणी पळ काढणारे दहशतवादी  ड्रोन फुटेजमध्ये दिसत आहे. त्यांचा खात्मा करेपर्यंत मोहीम सुरूच राहील, असे दिसते.

रियासी जिल्ह्यात एसआयएच्या धाडी
रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून मोठ्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष तपास संस्थेने (एसआयए) जिल्ह्याच्या उंचावरील भागात शोधमोहीम राबविली, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. 

घुसखोरीचा प्रयत्न आणि झाला खात्मा
बारामुल्लाच्या उरी सेक्टरमधील हातलांगा सीमावर्ती भागात लष्करी मोहिमेत तीन दहशतवादी ठार झाले. तिघेजण भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करताच सतर्क जवानांनी त्यांना आव्हान दिले आणि नंतरच्या चकमकीत त्यांचा खात्मा केला.

अधिकाऱ्यांचा दौरा
उत्तरेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी चकमक झालेल्या स्थितीचा आढावा घेतला. तंत्रज्ञानाने युक्त पाळत प्रणाली आणि अत्याधुनिक शस्त्रे वापरण्यात येत असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला