फक्त चेहरा दाखवा विमानतळावर प्रवेश मिळवा; केंद्राची डिजी यात्रा योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 12:55 PM2018-10-04T12:55:29+5:302018-10-04T12:57:40+5:30

केंद्र सरकारच्या डिजी यात्रा योजनेनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. कोणत्याही ओळखपत्राची गरज भासणार नाही.

use facial recognition biometrics to enter airports; Center's Diji yatra Plan | फक्त चेहरा दाखवा विमानतळावर प्रवेश मिळवा; केंद्राची डिजी यात्रा योजना

फक्त चेहरा दाखवा विमानतळावर प्रवेश मिळवा; केंद्राची डिजी यात्रा योजना

नवी दिल्ली : देशातील विमानतळांवर प्रवेश मिळविण्यासाठी आता कोणत्याही ओळखपत्राची गरज भासणार नसून चेहरा ओळखण्याच्या प्रणालीद्वारे बायोमेट्रीक ओळख पटवून आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. केंद्र सरकारच्या डिजी यात्रा योजनेनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. 


नागरी विमानोड्डान खात्याचे मंत्री सुरेश प्रभू यांनी तंत्रज्ञानाच्या पलीकडील पाऊल असे या निर्णयाची स्तुती केली आहे. ही योजना लवकरच सुरु करण्यात येणार आहे. हवाई यात्रा करु इच्छिणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या चेहऱ्याची ओळख पटविण्याची सोय ऐच्छिक असणार आहे. या सोईमुळे प्रवाशांना कोणतेही कागदपत्र न दाखविता हवाई प्रवास करता येणार आहे. 




बायोमेट्रीक नोंदीसाठी विमानतळावर वेगळा कक्ष सुरु करण्यात येणार आहे. ही सुविधा पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरु करण्यात येईल.

Web Title: use facial recognition biometrics to enter airports; Center's Diji yatra Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.