शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांकडून ‘कॅलक्युलेटर’ अ‍ॅपचा वापर

By admin | Updated: June 6, 2016 02:03 IST

पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसखोरी करणारे पाक प्रशिक्षित दहशतवादी भारतीय लष्कराच्या इलेक्ट्रॉनिक टेहळणीला चकमा देण्यासाठी त्यांच्या स्मार्टफोनवर खास

श्रीनगर/नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसखोरी करणारे पाक प्रशिक्षित दहशतवादी भारतीय लष्कराच्या इलेक्ट्रॉनिक टेहळणीला चकमा देण्यासाठी त्यांच्या स्मार्टफोनवर खास प्रकारचे कॅलक्युलेटर अ‍ॅप वापरत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे हे घुसखोर पाकिस्तानातील त्यांच्या ‘हॅण्डलर’शी कायम संपर्कात राहू शकतात.जम्मू-काश्मिरात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या स्मार्ट फोनमध्ये नवा ‘कॅलक्युलेटर’ हा अ‍ॅप आढळला आहे. या अ‍ॅपमुळे दहशतवाद्यांना पाकव्याप्त काश्मिरात बसलेल्या आपल्या प्रमुखांशी संपर्क साधण्यात आणि भारतीय लष्कराकडून केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक टेहळणीतून वाचण्यास मदत मिळते, असे दिसून आले आहे. या वर्षी पाकव्याप्त काश्मिरातून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यानंतर हे दहशतवादी स्मार्ट फोन सोबत घेऊन आले होते, ज्यात कोणताही संदेश नव्हता, असे आढळले आहे.या तंत्रज्ञानाचा वापर सर्वांत आधी अमेरिकेच्या कॅटरिना चक्रीवादळादरम्यान वादळग्रस्तांशी संपर्क करण्यासाठी एका कंपनीने केला होता. लष्कर-ए-तोयबाच्या काही दहशतवाद्यांची चौकशी केल्यानंतर ही माहिती उघड झाली. या दहशतवादी संघटनेने स्वत:ला अत्याधुनिक बनविले आहे आणि कॅलक्युलेटर नावाचा नवा अ‍ॅप तयार केला आहे, जो डाऊनलोड केला जाऊ शकतो आणि तो मोबाईल नेटवर्क नसतानाही काम करतो. हे तंत्रज्ञान कॉग्निटिव्ह डिजिटल रेडिओच्या संकल्पनेवर आधारित आहे. त्याचा वापर करणारा आपल्या स्मार्ट फोनला विना नेटवर्क असलेल्या दूरसंचार उपकरणासारखा उपयोगात आणू शकतो.हे नेटवर्क स्वत:चे सिग्नल तयार करते आणि निश्चित अंतरावर उपस्थित असलेल्या दुसऱ्या युनिटसोबतही संपर्क स्थापित करू शकते. तसेच या दोघांदरम्यान संदेशाचे आणि जीपीएस स्थळांचे आदानप्रदान करणे शक्य होते.