शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका म्हणते पाकने जैश-ए-मोहंमद, लष्कर-ए-तोयबाच्या मुसक्या आवळल्या

By admin | Updated: January 6, 2015 02:32 IST

पाकिस्तान केरी-लुगर विधेयकांतर्गत साहाय्य पॅकेज मिळविण्यास पात्र असल्याचे अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी प्रमाणित केल्यामुळे पाकला अमेरिकेची भरीव मदत प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तान केरी-लुगर विधेयकांतर्गत साहाय्य पॅकेज मिळविण्यास पात्र असल्याचे अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी प्रमाणित केल्यामुळे पाकला अमेरिकेची भरीव मदत प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकने अल-कायदा, तालिबान व लष्कर ए तोयबा या अतिरेकी संघटनांना आपल्या भूभागात, तसेच सीमेपलीकडे कारवाया करण्यापासून रोखले, असा केरींच्या या प्रमाणपत्राचा अर्थ होतो. यामुळे भारतात जनक्षोभ निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने पाकला केरी-लुगर पॅकेजसाठी पात्र ठरविल्याचे वृत्त टाइम्स नाऊने सोमवारी दिले. केरी-लुगर विधेयकांतर्गत पाकला नागरी साहाय्य पॅकेज देण्यासाठी काही अटी घालण्यात आलेल्या आहेत. अल-कायदा, तालिबान व जैश ए मोहंमद, लष्कर ए तोयबासारख्या संलग्न संघटनांना आपल्या भूभागातून कारवाया, तसेच सीमापार हल्ले करण्यापासून रोखणे आदी अटींचा त्यात समावेश आहे. पाकने या अटींचे पालन केल्याचे अमेरिकी प्रशासनाने प्रमाणित केले तरच पाकला केरी-लुगर विधेयक अर्थात पाकिस्तानसोबतची वाढीव भागीदारी कायदा २००९ अंतर्गत साहाय्यता पॅकेज मिळू शकते. पाकने २०१४ मध्ये या अटी पाळल्याच्या प्रमाणपत्रावर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी स्वाक्षरी केली आहे. हे प्रमाणपत्र बहाल केल्यानंतर केरी या महिन्यातच व्यूहात्मक चर्चेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहंमदचे प्रमुख हाफीज सईद आणि मसूद अजहर यांनी गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये जाहीर सभा घेतल्या असताना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकला हे प्रमाणपत्र दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)