शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
4
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
5
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
6
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
7
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
8
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
9
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
10
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
11
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
12
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
13
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
14
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
15
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
17
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
18
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
19
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
20
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच

छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 17:25 IST

UP Crime : जबरदस्तीने हिंदू मुलींचे धर्मांतर करणाऱ्या छांगूर बाबाची ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची मालमत्ता ईडीच्या हाती लागली आहे.

UP Crime : जबरदस्तीने शेकडो हिंदू मुला-मुलींचे धर्मांतर केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील जलालुद्दीन करुमुल्ला उर्फ छांगूर बाबा सध्या चर्चेत आहे. छांगूर बाबाला अटक केल्यानंतर युपी सरकारने त्याच्या संपत्तीवर बुलडोझर चालवला, शिवाय आता त्याचे आर्थिक नेटवर्कही उद्ध्वस्त केले जात आहे. आरोपीने परदेशी निधीतून भारतात कोट्यवधी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जमवल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, आरोपीची पुणे आणि मुंबईतही मालमत्ता आढळली आहे.

पुण्यात २०० कोटींची मालमत्तामिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या हाती काही कागदपत्रे लागली आहेत, ज्यात छांगूर बाबाने पुण्यातील मावळमधील आदिवासींकडून २०२३ साली १६ कोटी रुपयांची जमीन खरेदी केल्याचे समोर आले आहे. या जमिनीची आजची किंमत २०० कोटींहून अधिक आहे. यासाठीचे ४९.८० लाख रुपये परदेशी निधीतून देण्यात आले होते. ही जमीन छांगूर बाबाच्या नावाने खरेदी करण्यात आली नव्हती, तर त्याचा जवळचा सहकारी नवीन घनश्याम रोहरा याच्यामार्फत खरेदी करण्यात आली होती.

टीव्ही९ हिंदीच्या वृत्तानुसार, छांगूर बाबा आणि त्याचे सहकारी जमीन विकून २०० कोटींचा नफा मिळवणार होते. ९ ऑगस्ट २०२३ रोजी या जमिनीसाठी एक करार करण्यात आला, ज्यामध्ये एकूण ६ नावे होती. या करारातील नफ्यापैकी अर्धा भाग बाबा छांगूर आणि त्याचा साथीदार नवीन रोहरा याचा आहे, तर उर्वरित अर्धा भाग मोहम्मद अहमद खानसह ३ आदिवासींचा आहे. 

अनेक बँक खात्यांत कोट्यवधींचा व्यवहारईडीच्या मते छांगूर बाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एकूण ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बेनामी मालमत्ता जमवल्या आहेत. यात पुण्यात तीन आलिशान फ्लॅट्स, एक ट्रस्ट (आस्वी चॅरिटेबल ट्रस्ट) आणि ४० बँक खात्यांमध्ये १०६ कोटी रुपयांचा संशयास्पद निधी ट्रॅक करण्यात आला आहे. या खात्यांपैकी १८ खात्यांमध्ये फक्त तीन महिन्यांत ६८ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत, ज्यापैकी ७ कोटी रुपये परदेशी देणग्या आहेत.

नेटवर्क देशभर पसरले होतेधर्मांतरासाठी कोड शब्द वापरला जात होता. काजळ लावणे म्हणजे मानसिक प्रभाव किंवा लोभ देऊन आमिष दाखवणे आणि दर्शन म्हणजे छांगूर बाबाशी पहिली भेट. ही टोळी आध्यात्मिक उपचार, शिक्षण आणि लोककल्याणाच्या नावाखाली धर्मांतर करत असे. त्याचे नेटवर्क उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पसरले होते. छांगूर बाबाचे नेटवर्क त्याची विश्वासू नीतू उर्फ नसरीन आणि पती नवीन रोहरा यांच्यामार्फत चालवले जात होते. 

टॅग्स :PuneपुणेUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय