UP Crime: धक्कादायक! पत्नी माहेरी गेल्याने पती नाराज, मारहाण करत पत्नीच्या नाकाचे तोडले लचके
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 11:11 IST2022-06-05T10:53:52+5:302022-06-05T11:11:31+5:30
UP Crime: उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नाकाचा चावा घेऊन लचके तोडल्याची घटना घडली आहे.

UP Crime: धक्कादायक! पत्नी माहेरी गेल्याने पती नाराज, मारहाण करत पत्नीच्या नाकाचे तोडले लचके
UP Crime:उत्तर प्रदेशातील बहराइचमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विक्षिप्त पतीने अवैध संबंधांच्या संशयावरुन दाताने पत्नीच्या नाकचे लचके तोडल्याची घटना घटली आहे. या घटनेनंतर पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
नेमकं काय झालं?
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बहराइचमधील बेदनापूर, कोतवाली ग्रामीण भागातील आहे. रजनी देवी नावाची महिला बेदनापूर येथील विद्युत विभागात कर्मचारी आहे. रजनीचे पती ज्ञानदत्त पाठकशी भांडण झाले. त्यानंतर ती रागावून माहेरी गेली. माहेरी गलेल्या पत्नीची माफी मागून पतीने तिला घरी परत बोलावले. यानंतर आरोपीने पतीने त्याच्या दोन साथीदारांसह पत्नीला तिकोरामोडजवळ नेले आणि दाताने पत्नीच्या नाकाचा चावा घेतला. यानंतर तिला गंभीर अवस्थेत वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
आरोपी फरार
शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर जखमी महिलेची आई कुसुम तिवारी यांनी सांगितले की, आरोपीने त्याच्या साथीदारांसोबत मिळून रजनी यांच्या नाकाचे लचके तोडले आणि जबर मारहाणही केली. सध्या आरोपीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी जखमी महिलेचा जबाब नोंदवला असून, फरार पतीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.