सोळा वर्षाच्या मुलाकडून पाच वर्षाच्या बालकावर अनैसर्गिक कृत्य

By Admin | Updated: December 27, 2015 00:12 IST2015-12-27T00:12:07+5:302015-12-27T00:12:07+5:30

जळगाव: चॉकलेटच्या बहाण्याने घरात बोलावून एका सोळा वर्षाच्या मुलाने पाच वर्षाच्या बालकावर अनैसिर्गक कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार शनिवारी दुपारी तीन वाजता गेंदालाल मील भागात घडला. या प्रकाराबाबत शहर पोलीस स्टेशनला कलम ३७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Unusual act of a six-year-old child with a five-year-old child | सोळा वर्षाच्या मुलाकडून पाच वर्षाच्या बालकावर अनैसर्गिक कृत्य

सोळा वर्षाच्या मुलाकडून पाच वर्षाच्या बालकावर अनैसर्गिक कृत्य

गाव: चॉकलेटच्या बहाण्याने घरात बोलावून एका सोळा वर्षाच्या मुलाने पाच वर्षाच्या बालकावर अनैसिर्गक कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार शनिवारी दुपारी तीन वाजता गेंदालाल मील भागात घडला. या प्रकाराबाबत शहर पोलीस स्टेशनला कलम ३७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
शिवाजी नगरातील गेंदालाल मील भागात राहणार्‍या या पाच वर्षाच्या बालकाचे वडील पाचोरा येथे कामानिमित्त गेले होते तर आई घरीच होती. टि.व्ही बघायचा असल्याने आईने त्याला परिसरातच राहणार्‍या आजीकडे पाठविले (सासूकडे) तेथून परत येत असताना शेजारी राहणार्‍या सोळा वर्षाच्या मुलाने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने या बालकाला घरात बोलावून घेतले व तेथे अनैसर्गिक कृत्य केले. झाल्याप्रकारामुळे बालक रडायला लागल्याने तो घरी धावतच गेला. त्याने सर्व हकीकत आईला सांगितली. नंतर त्याच्या आईने पतीला तसेच अन्य नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. सर्व नातेवाईकांनी शहर पोलीस स्टेशन गाठून हकीकत सांगितली. त्यानुसार पोलिसांनी संशयित मुलाला ताब्यात घेतले. संध्याकाळी बालकाची जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करण्यात आली.सहायक निरीक्षक बी.आय.जानकर तपास करीत आहेत.

Web Title: Unusual act of a six-year-old child with a five-year-old child