शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

'Republic TV'चं IBF चं सदस्यत्व रद्द करा; एनबीएची मागणी

By जयदीप दाभोळकर | Published: January 19, 2021 12:22 PM

काही दिवसांपूर्वी अर्णब गोस्वामी, पार्थो दास यांच्यातील संभाषण झालं होतं व्हायरल

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी अर्णब गोस्वामी, पार्थो दास यांच्यातील संभाषण झालं होतं व्हायरलरिपल्बिक टीव्हीचं आयबीएफ सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

आऊटलायर मीडियाचे (रिपब्लिक टीव्ही) व्यवस्थापकीय संचालक अर्णब गोस्वामी आणि BARC इंडियाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यादरम्यान व्हॉट्सअॅपवर झालेलं संभाषण व्हायरल झालं होतं. यानंतर या प्रकरणी न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशननं आपली प्रतिक्रिया देत देत रिपब्लिक टिव्हीची आयबीएफ सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. तसंच अनेक महिन्यांपर्यंत बनावट पद्धतीनं रिपब्लिक टिव्ही पाहणारे अधिक लोकं असल्याचे दाखवण्यासाठी दोघांमध्ये संगनमत झाल्याचं स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. एनबीएनं रिपब्लिक टिव्हीची इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशनचं सदस्यत्व तात्काळ पद्धतीनं रद्द करण्याची मागणी केली आहे. "व्हॉट्सअॅपवरील संदेशांवरून गेल्या काही महिन्यांपासून बनावट पद्धतीनं रिपब्लिक टीव्ही पाहणाऱ्यांची संख्या अधिक दाखवण्यात आली आणि अन्य वाहिन्यांचं रेटिंग कमी करण्यात आला. याचाच अर्थ यामुळे रिपब्लिक टीव्हीला फायदा पोहोचवण्यात आला," असं एनबीएनं म्हटलं आहे. "हे व्हॉट्सअॅपवरील मेसेज ना केवळ रेटिंगमधील हेराफेरी दर्शवतात तर यावरून सत्तेचा खेळही दिसून येतो. संदेशांच्या देवाणघेवाणीमध्ये सरकारमध्ये सचिवांची नियुक्ती, मंत्रिमंडळात बदल, पीएमओपर्यंत पोहोच, तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयापर्यंत कामकाजावर प्रकाश पडत आहे. यावरून एनबीएद्वारे गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या आरोपांना दुजोरा मिळत आहे," असंही एनबीएनं म्हटलं आहे. BARC रेटिंग सिस्टमपासून बाहेर ठेवा"रिपब्लिक टीव्हीचं प्रकरण जोवर न्यायालयात प्रलंबित आहे तोवर त्यांचं आयबीएफचं सदस्यत्व तात्काळ प्रभावानं रद्द करण्यात यावं. रिपब्लिक टीव्हीद्वारे रेटिंगमध्ये हेराफेरी केल्यामुळे या उद्योगाला मोठं नुकसान झालं आहे आणि यामुळेच न्यायालयाचा अंतिम निर्णय येत नाही तोवर या क्षेत्राला BARC रेटिंग सिस्टमपासून बाहेर ठेवावं," अशी मागणीही आयबीएफनं केली आहे. सध्या या रेटिंगवर विश्वास ठेवता येणार नाही. तसंच संवादावरून हा कारभार मनमानी पद्धतीनं सुरू असल्याचं दिसत आहे. यावरून या व्यवस्थेवर कोणाचाही अंकुश नसल्याचं दिसून येत आहे आणि बार्कमधील काही लोकं आपल्या मर्जीनुसार रेटिंगमध्ये बदल करत आहे. ही सिस्टम पारदर्शक प्रणाली ऐवजी मॅनेजमेंटच्या मनमर्जीनं सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. 

रिपोर्ट दाबला"वास्तवात पाहिलं तर कोणतंही कठोर पाऊल उचलण्याऐवजी बार्कनं जुलै २०२० पासून अनेक महिने अहवाल दाबून ठेवला. यावरून हेराफारीवर प्रकाश पडू शकतो. गोपनीयतेबाबत सांगून बार्क न केवळ एनबीएला आकडेवारी दाखवण्यापासून वाचत आलं आहे. तसंच त्यांनी ब्रॉडकास्टर्स विरोझात कारवाई केली नाही, ना कोणता दंड ठोठावला, ना कारवाई सुरू करण्याक आली," असंही एनबीएनं म्हटलं आहे. 

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीRepublic TVरिपब्लिक टीव्हीTRP Scamटीआरपी घोटाळाTelevisionटेलिव्हिजन