शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या जागेवर अनारक्षीत प्रवासी रेल्वेतील दांडगाई : वाराणसी-रत्नागिरी एक्सप्रेसचा खोळंबा

By admin | Updated: December 16, 2015 23:49 IST

जळगाव : कोकणच्या सहलीला जाणार्‍या काशीनाथ पलोड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षित जागेवर इतर प्रवासी बसल्याने जागेअभावी झालेल्या वादामुळे अप १२१६६ वाराणसी-रत्नागिरी एक्सप्रेस ही रेल्वेगाडी संतप्त पालकांनी बुधवारी जळगाव स्थानकावर रोखून धरली. त्यामुळे या गाडीचा येथे २८ मिनिटे खोळंबा झाला. या विद्यालयाच्या ७० विद्यार्थ्यांचे कोकणात सहलीसाठी अप १२१६६ वाराणसी-रत्नागिरी एक्सप्रेस या गाडीनेआरक्षण ...



जळगाव : कोकणच्या सहलीला जाणार्‍या काशीनाथ पलोड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षित जागेवर इतर प्रवासी बसल्याने जागेअभावी झालेल्या वादामुळे अप १२१६६ वाराणसी-रत्नागिरी एक्सप्रेस ही रेल्वेगाडी संतप्त पालकांनी बुधवारी जळगाव स्थानकावर रोखून धरली. त्यामुळे या गाडीचा येथे २८ मिनिटे खोळंबा झाला.
या विद्यालयाच्या ७० विद्यार्थ्यांचे कोकणात सहलीसाठी अप १२१६६ वाराणसी-रत्नागिरी एक्सप्रेस या गाडीनेआरक्षण होते. असे असले तरी या गाडीत विद्यार्थ्यांच्या आरक्षित आसनांवर दुसरेच प्रवासी बसलेले होते. विद्यार्थ्यांना गाडीत चढण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. या मुळे पालक संतप्त झाले. विद्यार्थ्यांना गाडीत प्रवेशच करता येत नसल्याने पालकांनी साखळी ओढून गाडी थांबवली. तरीदेखील जागा बळकावून बसलेले अनारक्षीत प्रवासी हलायला तयार नसल्याने तब्बल चार वेळा साखळी खेचून गाडी थांबवली गेली. विद्यार्थी कसेबसे गाडीत चढले मात्र त्यांना बसायला जागा मिळालीच नाही. रेल्वे सुरक्षा बलाने गाडी अखेर तशीच रवाना केली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने मनमाड स्थानकावर संपर्क साधून तेथे विद्यार्थ्यांना जागा करून देणाच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे गाडीला जळगाव स्टेशनवर २८ मिनिटे विलंब झाला.