शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

महागणपती सहकार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

सोसायटी निवडणूक : बाराही जागा जिंकल्या

सोसायटी निवडणूक : बाराही जागा जिंकल्या
रांजणगाव गणपती : येथील रांजणगाव गणपती विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक चुरशीची झाली. या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत महागणपती सहकार पॅनेलने सर्व जागा जिंकून सोसायटीवर पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
विरोधी मंगलमूर्ती परिवर्तन पॅनेलला एकही जागा जिंकता न आल्याने त्यांना दारूण पराभव पत्करावा लागला. निवडणुकीपूर्वी विद्यमान संचालक विष्णू साळंुके हे सत्ताधारी पॅनेलकडून बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित १२ जांगासाठी ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत माजी जि.प.सदस्य शेखर पाचुंदकर व शिरूर बाजार समितीचे उपसभापती मानसिंग पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखालील महागणपती पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
निवडणुकीसाठी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शिरूर व शिक्रापूर येथील पोलिसांना बंदोबस्तासाठी घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या वेळी विजयी उमेदवारंाची महागणपती मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
शेखर पाचुंदकर, मानसिंग पाचुंदकर यांच्या हस्ते सर्व विजयी उमेदवारांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी आंबेगाव-शिरूर मतदार संघ राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब भोर, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्ताशेठ पाचुंदकर, सरपंच स्वाती पाचुंदकर उपसरपंच नवनाथ लांडे उपस्थित होते. आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविले जातील, असे पॅनेलप्रमुखांनी सांगितले.

चौकट
महागणपती पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :
सर्व साधारण कर्जदार प्रतिनिधी-सुभाष फंड, गोरक्ष गदादे, केरू कुटे, भाऊसाहेब लांडे, प्रकाश लांडे, सुनील लांडे, विठ्ठल लांडे, काळुराम पाचुंदकर.
अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी-मंगेश शेलार, महिला प्रतिनिधी सुनीता पाचुंदकर, शोभा शेळके, तर इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून आत्माराम खेडकर हे या निवडणुकीत विजयी झाले आहेत.
फोटो : रांजणगाव गणपती येथील सोसायटीच्या निवडणुकीत महागणपती पॅनेलचे उमेदवार विजयोत्सव साजरा करताना.