शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

Union Budget 2019: एका मध्यमवर्गीय कुटुंबाचे बजेट असेल तरी कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 3:45 AM

पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाल्याने आता महागाईचे चटके बसणार असल्याने सर्वसामान्य माणूस चिंतीत झाला आहे.

प्रचंड बहुमताने सलग दुसऱ्यांदा सत्तारूढ झालेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील नरेंद्र मोदी सरकारकडून नागरिकांच्या बºयाच अपेक्षा होत्या. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये यापैकी काही अपेक्षांची पूर्ती होण्याची अपेक्षा होती मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये मध्यमर्गीयांना आभाराशिवाय फारसे काही मिळाले नाही. त्यामुळे सर्व मध्यमवर्गीय हिसमुसले आहेत. त्याचवेळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाल्याने आता महागाईचे चटके बसणार असल्याने सर्वसामान्य माणूस चिंतीत झाला आहे.गृहिणींसाठी काय?महिला अर्थमंत्र्यांच्या या अर्थसंकल्पाकडून महिलांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र महिला सबलीकरणाच्या काही योजना आणि ‘नारी नारायणी’ची घोषणा याशिवाय करविषयक कोणताही बदल करºयात आलेला नसल्याने महिलावर्ग नाराज आहे.नोकरदारांसाठी काय?पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त आहे. याशिवाय अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलेली परवडणाºया घरांसाठीच्या कर्जावरील व्याजाची सूट तसेच इलेक्ट्रिक कारच्या खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची सूट अशा आणखी तीन लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर लागणार नाही.वृद्धांसाठी काय?फेब्रुवारी महिन्यामध्ये मांडण्यात आलेल्या हंगामी अर्थसंकल्पामधील बहुसंख्य तरतुदी कायम ठेवण्यात आल्याने या अर्थसंकल्पाने वअध्धांना फारसे काही दिलेले नाही.

युवकांच्या हाती काय लागले?इलेक्ट्रिकल वाहने बनविण्यामध्ये भारताला ग्लोबल हब बनविण्यासाठी सरकारने आपली वचनबद्धता स्पष्ट केली आहे. यामुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील.पेट्रोल दरवाढीने खर्चामध्ये वाढपेट्रोलच्या तसेच डिझेलच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे मध्यमवर्गीयांच्या मासिक खर्चामध्ये मोठी वाढ होणार आहे. सहा जणांचे कुटुंब धरल्यास यामध्ये किमान दोन ते तीन दुचाकी वाहने तसेच एक चारचाकी वाहन असते. यातील प्रत्येक दुचाकी वाहनाला महिन्याला सरासरी २०० रुपये जादा खर्च येण्याची शक्यता आहे. याशिवाय चारचाकीच्या खर्चामध्येही महिन्याला ८०० ते १००० रुपयांची वाढ होऊ शकते. याचाच अर्थ इंधन दरवाढीमुळे एका कुटुंबाचा महिन्याचा खर्च सुमारे १५०० ते १६०० रुपयांनी वाढणार आहे.- स्वत:च्या आरोग्य विम्यासाठी मिळणारी २५ हजार रुपयांची सूट, तसेच आई-वडिलांच्या आरोग्य विम्यासाठी मिळणारी २५ हजार रुपयांची सूट, राष्टÑीय पेन्शन योजनेमध्ये गुंतविलेल्या ५० हजार रुपयांपर्यंत मिळणारी सूट लक्षात घेता ९ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त स्वरूपामध्ये मिळू शकते. मात्र उच्च उत्पन्न गट असल्यास अधिभार वाढणार आहे.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019