धक्कादायक! काँग्रेस आमदाराच्या जावयाने रिक्षा आणि बाइकला चिरडलं; 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 13:30 IST2022-08-12T13:28:44+5:302022-08-12T13:30:09+5:30

पोलिसांनी आरोपीविरोधात हिट अँड रनची केस दाखल करुन त्याला ताब्यात घेतलं आहे.

Unfortunate! Congress MLA's son-in-law crushes rickshaw and bike; 6 people died... | धक्कादायक! काँग्रेस आमदाराच्या जावयाने रिक्षा आणि बाइकला चिरडलं; 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू...

धक्कादायक! काँग्रेस आमदाराच्या जावयाने रिक्षा आणि बाइकला चिरडलं; 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू...

आनंद:गुजरात राज्यातील आनंद (Gujrat Anand District) जिल्ह्यात एक मोठा अपघात (Accident) झाला आहे. येथील सोजित्रा तहसीलच्या डाली गावाजवळ भरधाव कारने ऑटो आणि बाइकला जोरदार धडक मारली. या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांपैकी चौघे एकाच कुटुंबातील होते. दरम्यान, या अपघातात कार चालकदेखील जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव कारमध्ये गुजरातमधील काँग्रेस आमदार पूनम परमार यांचा जावई होता. आता याप्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी या व्यक्तीवर हिट अँड रन केसची तक्रार दाखल केली आहे. अपघातावेळी रिक्षात 4 आणि बाइकवर दोघे होते. अपघातात रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांनी रुग्णालयात नेत असताना प्राण सोडले. 

दुर्दैवी बाब म्हणजे, मृतांमधील दोन मुली आपल्या भावाला राखी बांधून परत येत होत्या. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपीचे नाव केतन पधियार असून, त्याला भारतीय दंडसंहिता 304 अंतर्गंत अटक करण्यात आली आहे. तसेच, आरोपीच्या ड्रायव्हरवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस अधिकारी अभिषेक गुप्ता यांनी दिली आहे.

Web Title: Unfortunate! Congress MLA's son-in-law crushes rickshaw and bike; 6 people died...