शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

अनपेक्षित प्रशस्तिपत्राने आयकरदाते सुखावले!

By admin | Updated: October 12, 2016 06:10 IST

प्रामाणिक करदात्यांसह सर्वच करदात्यांचा छळ करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आयकर विभागाने करदात्यांना कर भरल्याबद्दल प्रशस्तिपत्रे पाठवून आश्चर्याचा धक्का

नवी दिल्ली : प्रामाणिक करदात्यांसह सर्वच करदात्यांचा छळ करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आयकर विभागाने करदात्यांना कर भरल्याबद्दल प्रशस्तिपत्रे पाठवून आश्चर्याचा धक्का दिला आहे. देशभरातील हजारो करदात्यांना ही प्रशस्तिपत्रे ई-मेलने पाठविली गेली. आयकर विभागाकडून अशा प्रकारची अजिबातच अपेक्षा नसल्याने अनेक करदात्यांचा यावर विश्वासच बसला नाही व त्यांनी हे मेल स्पॅममध्येही टाकले.ज्यांनी हा मेल ओपन केला त्यांना मात्र त्यासोबत पाठविलेले स्वत:च्या नावाचे आकर्षक रंगसंगतीमधील प्रशस्तिपत्र वाचून अभिमान वाटला व त्यांनी ते आप्तेष्टांना दाखवून कौतुक करून घेतले. संबंधित करदात्याने सन २०१६-१७ या करनिर्धारण वर्षासाठीचा आपल्या वाट्याचा आयकर भरला आहे व रीटर्नही भरले आहेत. आपल्या थोर देशाच्या जडणघडणीस हातभार लावल्याबद्दल हे प्रशस्तिपत्र देऊन आम्ही कौतुक करीत आहोत, अशा आशयाचे हे प्रमाणपत्र आहे.केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अध्यक्षा राणी सिंग नायर यांच्या स्वाक्षरीने ही प्रमाणपत्रे दिली गेली आहेत. प्रमाणपत्राच्या तळाशी बारकोड आहे, पण त्याचा करदात्याला उपयोग काय, हे मात्र स्पष्ट होत नाही. करदात्यांची त्यांनी भरलेल्या कराच्या रकमेनुसार वर्गवारी करून त्यांना प्लॅटिनम, सुवर्र्ण, रौप्य, व ब्रॉन्झ अशा श्रेणींत ही प्रमाणपत्रे दिली गेली आहेत. साधारणत: १ लाख ते १0 लाख यादरम्यान कर अदा करणाऱ्यांना ब्रॉन्झ, १0 ते ५0 लाख यामधील करदात्यांना रौप्य, ५0 लाख ते १ कोटी कर अदा करणाऱ्यांना सुवर्ण तर १ कोटीपेक्षा जास्त कर भरणाऱ्या मोजक्या करदात्यांना प्लॅटिनम वर्गातील प्रशस्तिपत्रे पाठविण्यात आली आहेत. या संदेशांची प्रशंसा होत आहे, तशीच त्यावर टीकाही केली जात आहे. हे संदेश काय उपयोगाचे आहेत? लोकांना मूर्ख बनवू नका, अशी टीका काही लोकांनी केली आहे. ज्यांनी आपला संपूर्ण कर भरला आहे तसेच ज्यांनी आपले रीटर्न आॅनलाइन व ३१ जुलैच्या आत भरले आहे, अशांना ही संदेशवजा प्रमाणपत्रे पाठविली गेली आहेत. सध्या हे संदेश ई-मेलद्वारे पाठविले जात आहेत. तथापि, गेल्या महिन्याच्या अखेरीस काही प्रमाणपत्रांचे वितरण अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते करण्यात आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)