शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आडवाणींच्या नेतृत्वाखालीदेखील आम्ही हरलोच की - नितिन गडकरी

By admin | Updated: November 11, 2015 17:00 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते नितिन गडकरी यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्या अध्यक्षेतखालीदेखील निवडणुका हरल्याची आठवण करून दिली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - बिहारमधल्या पराभवाचं खापर केवळ नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्यावर फोडणं अन्यायाचं ठरेल असं सांगताना भाजपाचे ज्येष्ठ नेते नितिन गडकरी यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्या अध्यक्षेतखालीदेखील निवडणुका हरल्याची आठवण करून दिली. आडवाणी, शांताकुमार, मुरली मनोहर जोशी आणि यशवंत सिन्हा यांनी बिहारच्या पराभवासाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत मोदी - शाह जोडीवर शरसंधान केले होते. परंतु गडकरी यांनी मोदींची पाठराखण करत भाजपातल्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात काहीही तथ्य नसल्याचेच सूचित केले आहे. 
आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि तो काही एखाद्या कुटुंबाचा पक्ष नाही, त्यामुळे जय पराजय ही सामूहिक जबाबदारी असल्याची भूमिका गडकरींनी मांडली आहे. तीन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी बेरजेचे राजकारण करत भाजपाचा पराभव केल्याचा दावा गडकरी यांनी केला आहे. भाजपाने अनेक जय व पराजय बघितले असून बिहारच्या संदर्भात पक्षाला पाच ते सात टक्क्यांनी जनाधार वाढवण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.
वादग्रस्त वक्तव्ये करणा-यांविरोधात कडक कारवाई करावी अशी सूचना आपण अध्यक्ष अमित शाह यांना केली असल्याचेही गडकरींनी सांगितले.