शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

अयोध्येतील प्रभावी भाषणासाठी उद्धव लागले कामाला; हिंदीची शिकवणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 10:55 AM

25 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दसऱ्या मेळाव्यात अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत. राम मंदिरावरुन भाषणावर तोफ डागण्यासाठी उद्घव यांनी विशेष तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे अयोध्येत जवळपास 1 तासभर भाषण करणार आहेत. या भाषणासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदी भाषेची शिकवणी लावली आहे. अयोध्येतील भाषण प्रभावी व्हावं, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 25 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. गेल्या साडेचार वर्षांपासून शिवसेना केंद्रात सत्तेत आहे. मात्र तरीही शिवसेनेच्या नेतृत्त्वाकडून कायम मोदी सरकारवर टीका केली जाते. त्यामुळे पहिल्यांदाच हिंदी पट्ट्यात जाणारे उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात नेमकं काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मोदी आणि भाजपाला 4 वर्ष राम आठवला नाही. मात्र निवडणूक जवळ येताच त्यांना रामाची आठवण झाली, अशी टीका उद्धव यांनी दसऱ्या मेळाव्यात केली होती. यानंतर शिवसेनेकडून उद्धव यांच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू झाली. अयोध्येतील भाषण प्रभावी व्हावं, यासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदीची शिकवणी सुरू केली आहे. 'दैनिक भास्कर'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. हिंदीतील धारदार शब्दांचा वापर करुन मोदी आणि भाजपाला लक्ष्य करण्याचा उद्धव यांचा इरादा आहे. उद्धव ठाकरे उत्तम हिंदी बोलतात, असं एका वरिष्ठ शिवसेना नेत्यानं सांगितलं. मात्र अयोध्येत संपूर्ण भाषण हिंदीत करायचं असल्यानं ते धारदार करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे, असं या नेत्यानं खासगीत बोलताना सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख पत्रकार परिषदेत हिंदीत बोलतात. हिंदी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांना ते हिंदीत उत्तरंदेखील देतात. मात्र त्यांनी अद्याप हिंदीत भाषण केलेलं नाही. अयोध्येतल्या त्यांच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असल्यानं उद्धव यांनी त्यासाठी विशेष मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAyodhyaअयोध्याShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीRam Mandirराम मंदिरBJPभाजपाhindiहिंदी