शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

जम्मू काश्मीरच्या बनिहालमध्ये लष्करी कॅम्पवर हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना पकडलं जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 8:54 AM

जम्मू-काश्मीरच्या बनिहाल जिल्ह्यात शुक्रवारी स्थानिक पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडलं आहे.

ठळक मुद्दे जम्मू-काश्मीरच्या बनिहाल जिल्ह्यात शुक्रवारी स्थानिक पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडलं आहे. बुधवारी (20 सप्टेंबर) या दहशतवाद्यांनी बनिहालमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला होता.शुक्रवारी रामबन पोलिसांनी दोन जणांना जिवंत पकडले.

श्रीनगर, दि. 22- जम्मू-काश्मीरच्या बनिहाल जिल्ह्यात शुक्रवारी स्थानिक पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडलं आहे.  बुधवारी (20 सप्टेंबर) या दहशतवाद्यांनी बनिहालमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला होता. त्यानंतर शुक्रवारी रामबन पोलिसांनी दोन जणांना जिवंत पकडले. या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली असून त्यांची नावं आरिफ आणि गजनफर अशी आहेत. या दोघांनी बुधवारी बनिहाल-काझीगड रस्त्यावरील बोगद्याजवळ सशस्त्र सुरक्षा दलाच्या दोन जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता, तर एक जवान जखमी झाला होता. यावेळी हल्ला करणाऱ्या त्या दोघांनी जवानांच्या रायफल्सही पळवून नेल्या होत्या.

शुक्रवारी रामबन पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांकडून पळवून नेलेले रायफल्स आणि बनिहालमधील हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तुल त्यांच्याकडून जप्त केले आहेत. बनिहालमधील हल्ल्याच्या वेळी दोन सर्विस रायफल लष्कराकडून या दहशतवाद्यांनी पळवून नेल्या होत्या, त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 

बनिहालमध्ये बुधवारी सशस्त्र सीमा दलाच्या कॅम्पवर झाला दहशतवादी हल्लाजम्मू-काश्मीरमधील बनिहालमध्ये सशस्त्र सीमा दलाच्या  कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्यात एक जवान शहीद झाला असून एक जण जखमी झाला आहे. रामबन जिल्ह्यातील बनिहालमध्ये सशस्त्र सीमा दलाच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता तर एक जण जखमी झाला, दरम्यान, सशस्त्र सीमा दलाच्या कॅम्पच्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. तसंच दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. पोलिसांचा तपास सुरू असताना आज दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात यश आलं आहे. 

शोपियान सेक्टरमध्ये हिजबुल मुजाहिदीनचा एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात भारतीय सैन्याला यश काश्मीर खोऱ्यात सुरक्षा रक्षकांनी दहशतवादविरोधी अभियान राबवताना बुधवारी हिजबुल मुजाहिद्दीनच्या आणखी एका दहशतवाद्याला ताब्यात घेतलं. अनंतनाग येथील बीजबहाडा रेल्वे स्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेतलं. तसेच, पोलिसांनी ओमपोरा येथे एक जिवंत बॉम्ब निकामी करीत एक मोठी दुर्घटना रोखण्यात यश मिळवलं होतं.  

टॅग्स :Terrorismदहशतवाद