शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेतील अँग्लो-इंडियन्सच्या २ राखीव जागा रद्द होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 02:53 IST

राज्यसभेत आज विधेयक येणार; ७० वर्षांपासून राष्ट्रपती करीत होते नियुक्त्या

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आणखी दहा वर्षांसाठी राखीव जागा वाढवून देण्याबाबतचे विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडले जाईल, तेव्हा त्याकडे सर्वांचे लक्ष असेल. या समाज घटकांना राखीव जागांचा लाभ वाढवून देण्यावरून राजकीय पक्षांमध्ये मतभेद आहेत म्हणून या विधेयकाकडे लक्ष असेल, असे नाही. कारण लोकसभेत ते मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या चर्चेनंतर एकमताने संमत झाले आहे. तरीही याच विधेयकात एक मुद्दा आहे.

लोकसभेत अँग्लो-इंडियन समाजासाठी असलेल्या दोन जागा रद्द करण्याचा मोदी सरकारचा हेतू आहे. देशाने १९५२ मध्ये घटना स्वीकारल्यापासून कलम ३३४ (बी) अंतर्गत अँग्लो इंडियन समाजाचे दोन सदस्य लोकसभेवर नाम नियुक्त केले जात आहेत. या समाजाला ७० वर्षांनंतर या राखीव जागांची गरज नाही याची जाणीव सरकारला झाल्यामुळे अनेक दशकांपूर्वीची ही तरतूद रद्द करण्यात आली आहे.

अँग्लो-इंडियन समाजाच्या सदस्यांसाठीच्या राखीव जागा या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. या विषयावर गरज भासल्यास नंतर फेरविचार केला जाईल. नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कारकिर्दीत लोकसभेवर अँग्लो-इंडियन समाजाचे दोन सदस्य नियुक्त केले गेले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, समाजकल्याण मंत्री थावरचंद गहलोत यांचा समावेश असलेल्या समितीने या दोन नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

संसदेमध्ये अनुसूचित जातीचे ८४ आणि अनुसूचित जमातीचे ४७ सदस्य आहेत. राखीव जागांचा लाभ त्यांना पुढेही मिळत राहील. या निर्णयामुळे राज्यसभेत ते विधेयक संमत झाले तर लोकसभेतील संख्याबळ सध्याच्या ५४५ वरून ५४३ होईल.भारताचे राष्ट्रपती अँग्लो-इंडियन समाजाचे दोन सदस्य नियुक्त करीत होते. लोकसभेवर ५४३ सदस्य निवडून गेल्यानंतर त्याचे संख्याबळ ५४५ व्हायचे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाAmit Shahअमित शहाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडू