परप्रांतियाकडून दोन गावठी कट्टे जप्त * दत्तवाडी पोलिसांची कारवाई

By Admin | Updated: September 20, 2015 22:41 IST2015-09-20T22:41:44+5:302015-09-20T22:41:44+5:30

फोटो वापरणे : लक्ष्मण लॉगिनमध्ये दत्तवाडी नावाने

Two pamphlets were seized by Parantatiya. Dattawadi police action | परप्रांतियाकडून दोन गावठी कट्टे जप्त * दत्तवाडी पोलिसांची कारवाई

परप्रांतियाकडून दोन गावठी कट्टे जप्त * दत्तवाडी पोलिसांची कारवाई

टो वापरणे : लक्ष्मण लॉगिनमध्ये दत्तवाडी नावाने
फोटो ओळ : जप्त केलेल्या शस्त्र आणि आरोपीस वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव, उपनिरीक्षक मोहिते, तानाजी निकम व अन्य

पुणे : दत्तवाडी पोलिसांच्या तपास पथकाने दोन गावठी कट्ट्यांसह उत्तर भारतीय तरुणाला जेरबंद केले असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी दुपारी लक्ष्मीनारायण सिनेमागृह चौकामध्ये करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी दिली.
मोहंमदअली उस्मान खान (वय 32, रा. आनंदनगर, जोगेश्वरी, मुंबई) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो मुळचा उत्तरप्रदेशातील भिंगार जिल्ह्यातील प्रतापपुरचा रहीवासी आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नवनाथ मोहिते यांना लक्ष्मीनारायण चौकामध्ये एक तरुण गावठी कट्टे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती खब-यामार्फत मिळाली होती. त्यानुसार, उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहायक आयुक्त (स्वारगेट) मिलींद मोहिते, वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव, निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ताजी मोहिते, तानाजी निकम, अशोक गवळी, मनोज कुदळे, निलेश जमदाडे यांनी सापळा लावला.
लक्ष्मीनारायण चौकामध्ये हिरव्या रंगाच्या टी शर्ट आणि बदामी रंगाची पॅंट घालून संशयास्पद अवस्थेत उभ्या असलेल्या खान याला पोलिसांनी पकडले. त्याच्या अंगझडतीमध्ये डाव्या कमरेला गावठी कट्टा व खिशात दोन काडतुसे तर हातातीतल कॅरीबॅगमध्ये एका कापडात गुंडाळेला आणखी एक देशी रिव्हॉल्वर आणि 10 जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी ही बेकायदा शस्त्र जप्त केली आहेत.

Web Title: Two pamphlets were seized by Parantatiya. Dattawadi police action