अमित शहांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा, सायंकाळी होणार भाजपाप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 12:52 PM2018-10-16T12:52:41+5:302018-10-16T12:56:43+5:30

शिरोडकर हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षही असून ते गेले दीड वर्ष भाजपाच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी त्यांचे चांगले नाते तयार झाले होते.

Two Congress MLAs resign after Amit Shah's visit, BJP enters the evening in Goa | अमित शहांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा, सायंकाळी होणार भाजपाप्रवेश

अमित शहांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा, सायंकाळी होणार भाजपाप्रवेश

Next

पणजी : काँग्रेसच्या दोन आमदारांनी आपल्या आमदारकीचाराजीनामा दिला आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट होताच, आमदार सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनी आपला राजीनामा दिला. त्यामुळे गोवाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच आमच्यासोबत आणखी 2 ते 3 आमदार भाजपात येतील, असेही सुभाष शिरोडकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे, गोव्यात सत्ता स्थापनेचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसमध्येच फूट पडल्याचे दिसते. काँग्रेसचे हे दोन्ही आमदार आज सायंकाळी भाजपात प्रवेश करणार आहेत. 

गोव्यातील काँग्रेसचे आमदार सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनी आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर, लगेचच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. या आमदारासोबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, मंत्री विश्वजित राणे व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हेही दिल्लीत आहेत.

शिरोडकर हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षही असून ते गेले दीड वर्ष भाजपाच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी त्यांचे चांगले नाते तयार झाले होते. मांद्रेचे आमदार सोपटे हे यापूर्वीच्या काळात भाजपामधून फुटून काँग्रेसमध्ये गेले होते. त्यावेळीही त्यांना मंत्री विश्वजित राणे यांनी भाजपामधून काँग्रेसमध्ये आणले होते, पण काँग्रेसच्या तिकीटावर त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. 2017 च्या निवडणुकीत सोपटे हे काँग्रेसच्या तिकीटावर मांद्रे मतदारसंघात जिंकले. तिथे त्यांनी ज्येष्ठ भाजपा नेते तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पराभूत केले होते. आता सोपटे व शिरोडकर या दोघांनाही भाजपामध्ये प्रवेश दिला जाईल व भाजपाचे तिकीटही दिले जाईल. प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर, मंत्री राणे आदींसोबत शिरोडकर व सोपटे हे अमित शहा यांना भेटतील व मग काँग्रेसमधील फुट अधिकृतरित्या जाहीर केली जाईल, असे सुत्रांनी सांगितले.


दरम्यान, मंत्री विश्वजित राणे यांच्याशी पर्रीकर सरकारमधील मंत्री विजय सरदेसाई यांनी मंगळवारी सकाळी फोनवरून संवाद साधला. काँग्रेसमध्ये फुट पडणार याचे भाकित आम्ही केले होते. त्यामुळे काँग्रेसचे दोन आमदार फुटतात याविषयी आमचा आक्षेप असण्याचे कारणच नाही. मात्र सत्ताधारी आघाडीच्या घटक पक्षातील कुठल्याच मंत्र्याला डच्चू दिला जाऊ नये असे मंत्री सरदेसाई यांनी मंत्री राणो यांना सांगितले आहे. मगोपचे मंत्री बाबू आजगावकर यांना डच्चू देऊन सोपटे यांना मंत्री केले जाईल अशा प्रकारची चर्चा राजकीय गोटात आहे पण त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मुख्यमंत्री पर्रीकर हे स्वत: सध्या आजारी असून ते त्यांच्या दोनापावल येथील निवासस्थानीच आहेत. 

Web Title: Two Congress MLAs resign after Amit Shah's visit, BJP enters the evening in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.