बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 22:06 IST2025-05-15T22:04:04+5:302025-05-15T22:06:06+5:30

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे बिहारच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. 

Two cases registered against Rahul Gandhi during Bihar tour, police accuse more than a hundred people | बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी

बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी

Rahul gandhi News: काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे बिहारच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात राहुल गांधींनी काही कार्यक्रमांना हजेरी लावली. पण, याच दौऱ्यात त्यांच्याविरोधात दोन एफआरआय दाखल करण्यात आल्या आहेत. यात पोलिसांनी राहुल गांधींसह २० नेते आणि इतर १०० अज्ञातांना आरोपी बनवले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राहुल गांधी यांनी दरंभगामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांची भेट घेतली. ही भेट आंबेडकर वसतिगृहात झाली. या भेटीसाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली नव्हती, अशी माहिती आता समोर आली आहे. 

प्रशासनाने दावा केला की, वसतिगृहात कोणत्याही प्रकारचा राजकीय कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली गेली नव्हती. तरीही राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी कार्यक्रम आयोजित केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन गु्न्हे दाखल केले आहेत. दोन्ही एफआरआयमध्ये राहुल गांधींचे नाव आहे. 

राहुल गांधींविरोधात दोन एफआरआय कशाच्या?

मिळालेल्या माहितीनुसार, पहिला एफआरआय भारतीय न्याय संहितेतील कलम १६३ चे उल्लंघन केल्या प्रकरणी नोंदवण्यात आला आहे. या कार्यक्रमावेळी तिथे हजर असलेले जिल्हाधिकारी खुर्शीद आलम यांनी ही तक्रार दिली आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष करून हा कार्यक्रम घेतला, असे या एफआरआयमध्ये म्हटलेले आहे. 

वाचा >>23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया

दुसरा एफआरआय आंबेडकर कल्याण वसतिगृहात परवानगी नसताना कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल नोंदवण्यात आला आहे. याला जिल्हा विकास अधिकारी अलोक कुमार यांनी दुजोरा दिला आहे. 

वसतिगृहात बळजबरी प्रवेश करून तिथे राजकीय कार्यक्रम घेण्यात आल्याची ही तक्रार आहे. याला दरभंगाचे एसडीपीओ अमित कुमार आणि एडीएम विकास कुमार यांनी दुजोरा दिला आहे. 

माझ्यासाठी हे मेडल आहेत - राहुल गांधी

विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, "माझ्यासाठी हे मेडल्स आहेत. माझ्याविरोधात ३०-३२ गुन्हे आहेत. मी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडला होता. हेही म्हटलो होतो की, खासगी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये आरक्षण लागू करण्यासंदर्भात जे कायदे आहेत, ते लागू करायला पाहिजेत. त्याचसोबत ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवली पाहिजे. या आमच्या मागण्या आहेत आणि आम्ही त्या पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही."

Web Title: Two cases registered against Rahul Gandhi during Bihar tour, police accuse more than a hundred people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.