काश्मिरमधील गडोल जंगलात लष्काराचे दोन जवान गायब, शोध मोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:46 IST2025-10-08T15:44:27+5:302025-10-08T15:46:40+5:30

काश्मीर खोऱ्यातील कोकेरनागमध्ये असलेल्या गडोलच्या जंगलात लष्कराचे दोन जवान बेपत्ता झाले. लष्कराने शोधमोहीम हाती घेतली आहे. 

Two army personnel missing in Gadol forest in Kashmir, search operation underway | काश्मिरमधील गडोल जंगलात लष्काराचे दोन जवान गायब, शोध मोहीम सुरू

काश्मिरमधील गडोल जंगलात लष्काराचे दोन जवान गायब, शोध मोहीम सुरू

दक्षिण काश्मिरातील कोकेरनागमध्ये गडोल जंगलात लष्कारचे दोन जवान बेपत्ता झाले आहेत. ही माहिती समोर आल्यानंतर लष्कराने त्यांना शोधण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. लष्कर, पोलिसांचा सर्च ऑपरेशनमध्ये समावेश आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. जवान ६ ऑक्टोबर रोजी जंगलात बेपत्ता झाले. दोन्ही जवान निमलष्करी दलात कार्यरत असून, ते अग्निवीर आहेत. 

दोन्ही जवान बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने सूत्रे हलवली. स्थानिक पोलीस आणि लष्करी जवानांना पाचारण करण्यात आले. संयुक्त पथकांनी जंगलात शोध मोहीम सुरू केली. 

दोन्ही जवानांच्या बेपत्ता होण्यामागे कोणतेही दहशतवादाचे कनेक्शन नसल्याचे सूत्रांनी सांगितले. शोध मोहीम सुरू असतानाच दोन्ही जवान ग्रुपमधून मागे राहिले आणि रस्ता भरकटले असावे, अशी माहिती दिली गेली आहे. 

किश्तवाड आणि अनंतनाग या दोन्ही शहराच्या मध्ये गडोल जंगलाचा भाग येतो. दोन्ही जवानांचा शोध सुरूच असून अद्याप जवानांचा ठिकाणा सापडलेला नाही. 

Web Title : कश्मीर के गडोले जंगल में दो सैनिक लापता; खोज जारी

Web Summary : दक्षिण कश्मीर के कोकेरनाग में गडोले जंगल में 6 अक्टूबर को दो सैनिक लापता हो गए। सेना और पुलिस द्वारा संयुक्त खोज अभियान जारी है। प्रारंभिक रिपोर्टों से पता चलता है कि कोई आतंकी संबंध नहीं है; सैनिक रास्ता भटक गए होंगे। खोज जारी है।

Web Title : Two Soldiers Missing in Kashmir's Gadol Forest; Search On

Web Summary : Two soldiers went missing in Gadol forest, Kokernag, South Kashmir, on October 6th. A joint search operation by the army and police is underway. Initial reports suggest no terror link; the soldiers may have lost their way. The search continues.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.