शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचं ट्विटर अकाऊंट Unverified; ब्लू टिक हटवली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 10:19 AM

ट्विटरवर अनेकांकडून संताप व्यक्त; भाजप नेत्यांचं ट्विटरवर टीकास्त्र

नवी दिल्ली: टूलकिट वादामुळे चर्चेत आलेल्या ट्विटरनं आता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या हँडलवरील ब्लू टिक हटवली आहे. महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या अकाऊंटला ट्विटरकडून ब्लू टिक दिली जाते. याचा अर्थ ते अकाऊंट व्हेरिफाईड आहे असा होतो. मात्र ट्विटरनं व्यंकय्या नायडूंच्या पर्सनल अकाऊंटवरील ब्लू टिक काढली आहे. ही माहिती समजताच अनेकांनी ट्विटरवरच आपला रोष व्यक्त केला.ट्विटरनं उपराष्ट्रपतींच्या हँडलची ब्लू टिक कशी काढली? हा भारतीय घटनेवरील हल्ला आहे, अशी संतप्त भावना भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश नाखुवा यांनी व्यक्त केली. मात्र काही ट्विटर वापरकर्त्यांच्या मते, नायडूंचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ते अनव्हेरिफाईड करण्यात आलं असावं.कोणत्या स्थितीत हटवली जाते ब्लू टिक?ट्विटरच्या अटींनुसार, एखादी व्यक्ती त्याच्या हँडलचं नाव (@handle) बदलते किंवा एखादं अकाऊंट बऱ्याच दिवसांपासून निष्क्रिय असतं किंवा ट्विटरनं ज्या कारणासाठी अकाऊंट व्हेरिफाय ते कारणच आता अस्तित्वात नसल्यास ब्लू टिक हटवली जाते. व्यंकय्या नायडूंकडून उपराष्ट्रपतींचं ट्विटर हँडल वापरलं जातं. त्यावरील ब्लू टिक कायम आहे.ट्विटर वि. भारत सरकार संघर्षसरकारच्या नव्या नियमावलीमुळे ट्विटर आणि सरकार आमनेसामने आल्यासारखी स्थिती आहे. गेल्या काही दिवसांत हा वाद वाढला आहे. नव्या नियमावलीबद्दल ट्विटर फारसं अनुकूल नाही. काही दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांनी ट्विटरवरील काही मजकूराबद्दल आक्षेप नोंदवत ट्विटर इंडियाच्या दिल्ली आणि गुरुग्राममधील कार्यालयांवर छापे टाकले होते.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूTwitterट्विटरToolkit Controversyटूलकिट वाद