संतापजनक! विजबिलाच्या वसुलीसाठी जप्त केल्या  शेतकऱ्यांकडील टीव्ही, फ्रिज आणि दुचाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 03:13 PM2020-07-22T15:13:38+5:302020-07-22T15:41:36+5:30

विजेचे बिल थकलेल्या काही शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून, काही शेतकऱ्यांच्या घरामधील टीव्ही, फ्रिज तसेच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

TVs, fridges and two-wheelers seized from farmers for recovery of electricity bills | संतापजनक! विजबिलाच्या वसुलीसाठी जप्त केल्या  शेतकऱ्यांकडील टीव्ही, फ्रिज आणि दुचाकी

संतापजनक! विजबिलाच्या वसुलीसाठी जप्त केल्या  शेतकऱ्यांकडील टीव्ही, फ्रिज आणि दुचाकी

googlenewsNext
ठळक मुद्दे वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थकीत विजबिलाच्या वसुलीसाठी केली ही कारवाई थकीत बिलाचा भरणा करण्यात संबंधित शेतकरी अपयशी ठरल्यानंतर त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली थकीत विजबिल नव्हते अशांवरही विजबिलांची वसुली करण्यासाठी जप्तीची कारवाई केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला

भोपाळ - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना मध्य प्रदेश सरकारने लॉकडाऊनच्या काळात विजबिलांबाबत काहीसा दिलासा दिला होता. मात्र आता राज्या थकीत विजबिलांच्या वसुलीसाठी वीज खात्याकडून ग्राहकांवर सक्ती सुरू झाली आहे. विजेचे बिल थकलेल्या काही शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून, काही शेतकऱ्यांच्या घरामधील टीव्ही, फ्रिज तसेच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मध्य प्रदेशमधील बेतुल येथील आमला ग्रामीण वीज वितरण कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या सहा गावांमध्ये वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थकीत विजबिलाच्या वसुलीसाठी ही कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत बडगाव, ब्राह्मणवाडा, खेडली बाजार, छिपन्यासह अन्य गावात शेतकऱ्यांच्या घरातून टीव्ही, दुचाकी, फ्रिज आदी दैनंदिन वापराचे सामान जप्त करण्यात आले.

या शेतकऱ्यांकडे सिंचन पंपांचे विजबिल थकीत होते. आमला परिसरात अशा ५१ शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. या शेतकऱ्यांना विजबिल वसुलीसाठी नोटीस पाठवण्यात आली होती.  मात्र थकीत बिलाचा भरणा करण्यात संबंधित शेतकरी अपयशी ठरल्यानंतर त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांचे थकीत विजबिल नव्हते अशांवरही विजबिलांची वसुली करण्यासाठी सक्ती करण्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वीज खात्याचे २५ लोक आले आणि माझी दुचाकी घेऊन गेले. खरंतर माझ्या नावावर विजेचे कनेक्शन देखील नाही, असे लक्ष्मण नावाच्या शेतकऱ्याने सांगितले, तर अधिकाऱ्यांच्या मते आमला केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या चार उपकेंद्रांच्या परिसरातील १०१ शेतकऱ्यांकडून २० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम येणे बाकी आहे. तर ५१ शेतकऱ्यांकडे ५० हजारांहून अधिक रक्कम थकलेली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

Web Title: TVs, fridges and two-wheelers seized from farmers for recovery of electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.