टाकळीगाव, वैदूवाडी परिसरात डासांचा उपद्रव

By Admin | Updated: May 5, 2014 16:32 IST2014-05-05T16:32:26+5:302014-05-05T16:32:26+5:30

नाशिक : प्रभाग क्रमांक ३१ मधील टाकळीगाव, वैदूवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर डासांचा उपद्रव वाढला असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाने परिसरात तत्काळ डास प्रतिबंधक औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Tuberculosis in the area of ​​Tikalgaon, Vaiduwadi | टाकळीगाव, वैदूवाडी परिसरात डासांचा उपद्रव

टाकळीगाव, वैदूवाडी परिसरात डासांचा उपद्रव

शिक : प्रभाग क्रमांक ३१ मधील टाकळीगाव, वैदूवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर डासांचा उपद्रव वाढला असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाने परिसरात तत्काळ डास प्रतिबंधक औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहराच्या तपमानात वाढ होत आहे. वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच त्यात डासांचा उपद्रव अस‘ करून सोडत आहे. दिवसा उन्हामुळे बाहेर पडणे मुश्किल तर रात्री डासांमुळे घरात बसणे अवघड होऊन बसले आहे. ड्रीमसिटी रस्त्यावरील उघड्या नाल्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. या नाल्याची नियमित सफाई होत नसल्याने ठिकठिकाणी सांडपाण्याची डबकी साचली आहेत. या तुंबलेल्या पाण्यामुळेच डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या नाल्याप्रमाणेच टाकळी गावातून जाणार्‍या नाल्याचीही बिकट स्थिती आहे. या दोन्ही नाल्यांची नियमित सफाई होत नाही. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासनाने परिसरात डास प्रतिबंधक औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते हिरामण लोखंडे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Web Title: Tuberculosis in the area of ​​Tikalgaon, Vaiduwadi