पोटनिवडणुकीत तृणमूलची सरशी

By Admin | Updated: February 17, 2015 02:29 IST2015-02-17T02:29:46+5:302015-02-17T02:29:46+5:30

वादविवादात सापडलेल्या तृणमूल काँग्रेसने वर्चस्व कायम राखत बोनगाव लोकसभा व कृष्णगंज विधानसभा जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे़

Trinamool sari in bye election | पोटनिवडणुकीत तृणमूलची सरशी

पोटनिवडणुकीत तृणमूलची सरशी

नवी दिल्ली : शारदा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर वादविवादात सापडलेल्या तृणमूल काँग्रेसने वर्चस्व कायम राखत बोनगाव लोकसभा व कृष्णगंज विधानसभा जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे़ तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा, अरुणाचल प्रदेश या तीन राज्यांतील पोटनिवडणुकीतही सत्ताधारी पक्षांनी बाजी मारली आहे़
बोनगाव लोकसभा आणि कृष्णगंज विधानसभा जागेसाठीच्या पोटनिवडणुकांकडे तृणमूलच्या लोकप्रियतेची लिट्मस टेस्ट म्हणून पाहिले गेले होते़ या चाचणीत तृणमूल अखेर यशस्वी ठरली़ गोव्यात सत्तारूढ भाजपने सहाव्यांदा पणजी विधानसभा जागेवर विजय नोंदवला़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Trinamool sari in bye election