'मै ठाकूर हूँ' म्हणणाऱ्या महिला बँक कर्मचाऱ्याची मांडली स्वत:ची बाजू; प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:08 IST2026-02-10T17:04:09+5:302026-02-10T17:08:02+5:30
Aastha Singh hdfc bank viral video: जातीचा उल्लेख का करावा लागला, याबद्दलही दिली माहिती

'मै ठाकूर हूँ' म्हणणाऱ्या महिला बँक कर्मचाऱ्याची मांडली स्वत:ची बाजू; प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
Aastha Singh hdfc bank viral video: गेले दोन दिवस कानपूरच्या पनकी सेक्टर-२ मधील एचडीएफसी बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या आस्था सिंहचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका ग्राहकाशी उद्धटपणे वागत असल्याचे दिसत होते. मात्र, आता आस्थाने या प्रकरणातील आपली बाजू स्पष्ट केली असून त्यामुळे प्रकरणात नवा ट्विस्ट आल्याचे दिसते आहे. हा व्हिडिओ संदर्भाशिवाय (Out of context) आणि तिला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक अर्धाच व्हायरल करण्यात आल्याचा तिचा आरोप आहे.
तो व्यक्ती 'ग्राहक' नव्हता...
आस्थाच्या दाव्यानुसार, ही घटना ६ जानेवारीची आहे, परंतु रितू त्रिपाठीचे बँकेतील सर्व पैसे मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक फेब्रुवारीमध्ये हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला, जेणेकरून आस्थाची प्रतिमा खराब करता येईल. आस्थाने सांगितले की ज्या व्यक्तीशी तिचा वाद झाला, तो कोणताही सामान्य ग्राहक नसून बँकेची माजी कर्मचारी रितू त्रिपाठी हिचा पती ऋषी त्रिपाठी होता. रितूने राजीनामा दिला होता आणि ती औपचारिकता पूर्ण करण्यासाठी बँकेत आली होती. आस्थाच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी सकाळी रितू त्रिपाठीच्या नणंदेसोबत तिचा बाथरुमच्या गेटजवळ किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर राग काढण्यासाठी ऋषी त्रिपाठी संध्याकाळी बँकेत आला आणि त्याने आस्थाशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.
HDFC staffer, Aastha Singh, clarifies on ‘Thakur hoon main' video, adds ‘still stand by my statement.’ pic.twitter.com/48B42Jvi6b
— NDTV (@ndtv) February 10, 2026
जातीचा उल्लेख केला...
व्हायरल व्हिडिओमध्ये आस्था 'मी ठाकूर आहे' असे म्हणताना दिसते. यावर तिने स्पष्टीकरण दिले की, ऋषीने तिच्या डेस्कवर येऊन तिची जात विचारली होती आणि तिला धमकावले होते की, "तू कोणत्या जातीची आहेस जी इतकी मस्ती दाखवत आहेस? मी तुझी सर्व मस्ती उतरवीन." या चिथावणीखोर विधानाला उत्तर देताना तिने आपल्या जातीचा उल्लेख केला होता.
"Thakur hoon main,"
— Manni (@ThadhaniManish_) February 9, 2026
This is Aastha Singh, an employee at HDFC Bank.
A customer initially argued over the bank’s services and later lowered the level of the conversation by becoming abusive. When the customer continued to behave rudely, Aastha Singh responded firmly and stood… pic.twitter.com/KoQxBHWZOZ
'डिजिटल लिंचिंग'चा प्रकार
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आस्थाला सोशल मीडियावर अत्यंत खालच्या पातळीवर ट्रोल केले जाऊ लागले. तिला बलात्काराच्या धमक्या मिळत असून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात असल्याचेही तिने सांगितले. आस्थाने या प्रकरणाची माहिती आधीच बँक व्यवस्थापनाला ईमेलद्वारे दिली आहे. तसेच, व्हिडिओ अर्धा कापून व्हायरल केल्याबद्दल आणि तिची बदनामी केल्याबद्दल ती ऋषी त्रिपाठी आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्यांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करणार आहे.