शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणाच्या मंत्र्यांना प्रत्युत्तर देणा-या महिला पोलिस अधिका-याची बदली

By admin | Updated: November 28, 2015 21:45 IST

हरियाणाचे आरोग्य व क्रीडामंत्री अनिल विज यांनी बाहेर जाण्याचा दिलेला आदेश मानण्यास नकार देणा-या महिला पोलिस अधिकारी संगीता कालिया यांची बदली करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. २८ - हरियाणाचे आरोग्य व क्रीडामंत्री अनिल विज यांनी बाहेर जाण्याचा दिलेला आदेश मानण्यास नकार देणा-या महिला पोलिस अधिकारी संगीता कालिया यांची बदली करण्यात आली आहे. 
शुक्रवारी झालेल्या जनतक्रार निवारण समितीच्या बैठकीचे अनिल विज हे अध्यक्षपद भूषवत होते. त्यावेळी इतर अधिका-यांसह संगीता कालिया या महिला पोलिस अधिकारीही उपस्थित होत्या. पंजाबमधील सीमा भागात होत असलेल्या दारुची तस्करी थांबवण्याबाबत पोलिसांची भूमिका काय असा प्रश्‍न विज यांनी उपस्थित केला. त्यावर पोलीस कारवाई करत असून आत्तापर्यंत अडीच हजार गुन्हे दाखल झाले, मात्र त्यापैकी बरेच आरोपी जामीनवर सुटले असल्याचे संगीता यांनी सांगितले. मात्र संगीता यांच्या उत्तराने विज यांचे समाधान न झाल्याने त्यांनी संगिता यांना 'गेट आऊट‘ असे म्हटले. मात्र आपली चूक नसल्याने संगीता यांनी बाहेर जाण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे संतापलेले विज स्वत:च बैठकीतून बाहेर पडले. जोपर्यंत कालिया फतेहाबादला आहेत तोपर्यंत मी तेथे जाणार नाही‘ असा इशाराही विज यांनी दिला. त्यानंतर आज (शनिवार) कालिया यांची बदली करण्यात आली.