ट्रॅक्टर चालकास अटक

By Admin | Updated: November 28, 2015 00:00 IST2015-11-28T00:00:10+5:302015-11-28T00:00:10+5:30

जळगाव: तालुक्यातील अमोदा खुर्द येथे तीन निष्पाप बालकाचा बळी घेणारा ट्रॅक्टर चालक पिंटू उर्फ सुनील भीमसिंग बारेला (वय २३, रा.उमर्टी ता.चोपडा ह.मु.अमोदा) याला शुक्रवारी पहाटे तालुका पोलिसांनी अटक केली. दरम्यान, न्यायालयाने त्याला संध्याकाळी जामिनावर मुक्तही केले. गुरुवारी दुपारी निष्काळजीपणाने ट्रॅक्टर चालवून रोटोव्हेटरमध्ये अडकल्याने तीन बालकांचा जीव गेला होता. घटनेनंतर चालक फरार झाला होता. शुक्रवारी पहाटे रवींद्र पवार, जितेंद्र पाटील यांनी त्याला गावातून अटक केली. दरम्यान, ट्रॅक्टर अद्यापही पोलिसांकडे जप्त आहे.

Tractor driver arrested | ट्रॅक्टर चालकास अटक

ट्रॅक्टर चालकास अटक

गाव: तालुक्यातील अमोदा खुर्द येथे तीन निष्पाप बालकाचा बळी घेणारा ट्रॅक्टर चालक पिंटू उर्फ सुनील भीमसिंग बारेला (वय २३, रा.उमर्टी ता.चोपडा ह.मु.अमोदा) याला शुक्रवारी पहाटे तालुका पोलिसांनी अटक केली. दरम्यान, न्यायालयाने त्याला संध्याकाळी जामिनावर मुक्तही केले. गुरुवारी दुपारी निष्काळजीपणाने ट्रॅक्टर चालवून रोटोव्हेटरमध्ये अडकल्याने तीन बालकांचा जीव गेला होता. घटनेनंतर चालक फरार झाला होता. शुक्रवारी पहाटे रवींद्र पवार, जितेंद्र पाटील यांनी त्याला गावातून अटक केली. दरम्यान, ट्रॅक्टर अद्यापही पोलिसांकडे जप्त आहे.

Web Title: Tractor driver arrested