शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

केजरींसाठी खडतर मार्ग?

By admin | Updated: February 14, 2015 23:35 IST

वर्षभरापूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा दिल्लीतील सत्तेची धुरा हाती घेतली

नितीन अग्रवाल - नवी दिल्लीवर्षभरापूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा दिल्लीतील सत्तेची धुरा हाती घेतली असली तरी दिल्लीच्या विकासाच्या दृष्टीने केजरीवाल सरकारसाठी पुढचा मार्ग मात्र तेवढा सोपा नाही.शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करूनही ना पंतप्रधान आले, ना केंद्रीयमंत्री. दिल्लीतील भाजपचे खासदारही आले नाहीत. हे लक्षात घेता पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीच्या विकासासाठी सहकार्य करण्याचा शब्द दिला असला तरी प्रत्यक्षात यासाठी केंद्र सरकारकडून सहकार्य मिळविणे केजरीवाल यांना कठीणच जाईल, असे दिसते.महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्याने पंतप्रधान शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणे शक्य नव्हते. तथापि, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि नागरी विकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनीही अन्य कार्यक्रमाला प्राधान्य देत शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरविली. दिल्लीचा विकास आणि अन्य सरकारी कामकाजासाठी या दोन केंद्रीय मंत्र्यांची केजरीवाल सरकारला गरज भासणार आहे.दिल्लीतील भाजपच्या सातही खासदारांना केजरीवाल यांनी अगत्याने शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. तेही रामलीला मैदानावर दिसले नाहीत. निमंत्रण उशिरा मिळाल्याने शपथविधी सोहळ्यात सहभागी होता आले नाही, अशी सबब दिल्लीतील एका खासदाराने सांगितली.निवडणुकीत केजरीवाल यांनी बरीच आश्वासने दिली आहेत. नवीन इस्पितळ, महाविद्यालये सुरू करण्यासह दिल्लीवासीयांना हक्काची घरे देणे तसेच महिलांना सुरक्षा देण्याचा वायदा केजरीवाल यांनी केला आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी केजरीवाल सरकारला केंद्र सरकारची पदोपदी मदत लागेल. दिल्ली विकास प्राधिकरणामार्फत (डीडीए) घरे उभारली जाणार असून डीडीए केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाच्या, तर सुरक्षेचा मुद्दा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील दिल्ली पोलिसांच्या कक्षेत येतो.सरकार चालविण्यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य लागेल, असे केजरीवाल यांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे पंतप्रधान, गृहमंत्री आणि नागरी विकासमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले होते, तर शिष्टाचार म्हणून भाजपच्या ७ खासदारांना निमंत्रण देण्यात आले होते.४मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी किरण बेदी आणि काँग्रेसचे अजय माकन यांच्या सल्ल्याने काम करणार असल्याचे सांगितले आहे. किरण बेदी यांना मोठी बहीण मानतो. आमचे सरकार आवश्यक तेथे त्यांचा सल्ला घेईल. कारण त्यांच्या पाठीशी दीर्घ प्रशासकीय अनुभव आहे. ४अजय माकन यांच्याशीही आम्ही सल्लामसलत करू. केंद्रीय मंत्री म्हणून योजना आखणे आणि त्या लागू करण्याचा त्यांना अनुभव आहे.४केजरीवाल यांच्या या वक्तव्याचे माकन आणि भाजपने स्वागत केले आहे.४सकारात्मक विधान करून केजरीवाल यांनी चांगली सुरुवात केली आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो, असे माकन म्हणाले.४केजरीवाल दिल्लीतील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करतील. यासाठी सहकार्य केले जाईल, असे भाजप नेते श्रीकांत शर्मा यांनी स्पष्ट केले.