शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

आज मोदी सरकारचा अर्थसंकल्प

By admin | Updated: February 28, 2015 09:25 IST

विकासदर मापनाच्या नव्या पद्धतीने मोजणी केल्यामुळे आगामी आर्थिक वर्षात देशाच्या विकासदरात १.१ टक्क्यांनी वाढ होत तो

नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर करतील. आजच्या अर्थसंकल्पातून मोदी सरकारची अर्थनीती स्पष्ट होणार असून या अर्थसंकल्पातून आम आदमीला 'अच्छे दिन' येतील आशा आहे. 

विकासदर मापनाच्या नव्या पद्धतीने मोजणी केल्यामुळे आगामी आर्थिक वर्षात देशाच्या विकासदरात १.१ टक्क्यांनी वाढ होत तो ८ टक्क्यांना स्पर्श करेल. अर्थकारणाला विकासाचा पुढचा टप्पा खुणावत आहे. मात्र, याकरिता आवश्यक अशा आर्थिक सुधारणा करताना त्या ‘जपून’ करण्याची सूचना शुक्रवारी सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात करण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहांत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात अर्थव्यवस्थेला उभारी येण्याच्या दृष्टीने विविध अंदाज वर्तविण्यात आले आहेत. नव्या आर्थिक वर्षाचे भाकीत वर्तविताना चालू आर्थिक वर्षात आर्थिक सुधारणांबाबत सरकारने जी पावले उचचली आहेत, त्याचा ठोस फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होणार असल्याचे यामध्ये नमूद केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी लाभदायी ठरली असून, या अनुषंगाने नव्या सरकारने चालू आर्थिक वर्षात केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. विशेषत: डिझेलच्या किमती सरकारी नियंत्रणातून मुक्त करणे, संरक्षण क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढविणे, इंधनाच्या दरात झालेली कपात काही प्रमाणात ग्राहकांपर्यंत पोहोचविल्याने महागाई काही प्रमाणात नियंत्रणात येण्याच्या रूपाने दिसून येईल, असे यात नमूद केले आहे. देशातील बचतीचा घसरलेला दर ही सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकेल, मात्र बचतीसाठी लोकांना प्रवृत्त करण्यासाठी कर बचतीच्या साधनांत गुंतवणुकीची मर्यादा वाढविणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)