शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आज युती तुटली तरी पुन्हा जुळेल

By admin | Updated: October 3, 2014 02:03 IST

शिवसेना-भाजपाची युती तुटल्याचे दु:ख आहेच, पण शिवसेना आणि उद्धव ठाकरें यांच्याबद्दल आमच्या मनात कोणतीही कटुता नाही. निवडणुकीनंतर पुन्हा एकत्न येण्याचा विचार करता येईल.

रघुनाथ पांडे
शिवसेना-भाजपाची युती तुटल्याचे दु:ख आहेच, पण शिवसेना आणि उद्धव ठाकरें यांच्याबद्दल आमच्या मनात कोणतीही कटुता नाही. निवडणुकीनंतर पुन्हा एकत्न येण्याचा विचार करता येईल. आज युती तुटली म्हणजे नेहमीसाठी तुटली असे होत नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.  
 
प्रश्न: महायुती का तुटली ?
गडकरी-महायुतीच्या वाटाघाटीपासून मी फार लांब होतो. पण युती व्हावी म्हणून  खूप आग्रही होतो. शिवसेनेने 151 जागांचा आग्रह कायम ठेवला. मुळात ज्यांच्या जागा अधिक त्यांचा मुख्यमंत्री असे सूत्र ठरले आहे. ते पद घ्यायला आमचीही हरकत नाही, पण निवडणुकीआधीच मुख्यमंत्नीपदाचा उमेदवार जाहीर करून 25 वर्षांची प्रथा त्यांनी मोडीत काढली. वाटाघाटीत 135 जागा भाजपाला मिळतील अशी अपेक्षा होती. पण सेना नेते शेवटपर्यंत ऐकतच नव्हते. 13क् ही आमची अखेरची संख्या होती. शिवसेनेने मोठ्या भावाच्या भूमिकेतून चांगले वागावे अशी अपेक्षा होती. नेहमीच त्यांची ताठर भूमिका असायची.
- तुम्ही वाटाघाटीमध्ये का नव्हते ?
राज्य व तेथील भाजपा नेते आणि पक्षाने चर्चेसाठी नेमलेले नेते तसेच पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यात चर्चा करायची असेच ठरले होते. मी केंद्रीय समितीमध्ये होतो.
- संवाद नसल्याने युती तुटली का ?
आम्ही संवाद ठेवला, तो वाढवला. पण त्यांनी आम्हाला चांगली वागणूक नाही दिली. बाळासाहेब म्हणाले होते लोकसभा तुम्ही लढा, पण विधानसभेत आमचा शेयर ठेवा. लोकसभेच्या जागा आम्ही सेनेसाठी सोडत होतो, पण विधानसभेच्या जागा नाही वाढल्या. काही जागांवर फेरबदल करण्याची विनंती केली. उपयोग होत नव्हता.
- पुन्हा एकत्न येणार ?
आमच्या मनात शिवसेना किवा उद्धव ठाकरें यांच्या बद्दल कोणतीही कटुता नाही. अनंत गीते यांनी राजीनामा देण्याची घाई करण्याची काहीच गरज नाही. कारणही नाही. भाजपाला राज्यात बहुमत मिळेल. निवडणुकीनंतर पुन्हा एकत्न येण्याचा विचार करता येईल. 
- सेनेला तुम्ही आता काय मानता ?
आम्ही विरोधक मानत नाही. विरोधी पक्ष मानत नाही. प्रचाराचा आमचा संपूर्ण रोख कॉंग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांविरोधात असेल. आम्हाला कटुता वाढवायची नाही . भविष्यात युती होऊ शकली तर आनंदच आहे.
- राज ठाकरेंची मैत्नी आड आली का ?
राजकारण हा खेळ आहे. जो जिता वही सिकन्दर. राजकारणातील संघर्ष केवळ निवडणुकीपुरता असतो.  त्यामुळे राजकारणात विरोधक आहोत दुश्मन नाही. राजकारणाचा  हिशोब लावून मी मैत्नी करत नाही.  राज ठाकरेंशी माझी वैयिक्तक मैत्नी आहे. ते लपविण्याचे कारण नाही. शरद पवार, नारायण राणो यांच्याशी माझी मैत्नी आहे. कशाला लपवू! पण राज यांची लोकसभा निवडणुकी दरम्यान घेतलेली भेट युती करावी म्हणून घेतली नव्हती. मात्न ती नेहमी उकरून काढली जाते, ते अयोग्य आहे.
- भाजपाची राष्ट्रवादीसोबत छुपी युती आहे?
खोटा प्रचार आहे. राजकारणासाठी आम्ही एकत्न येणार नाही, कोणतीच छुपी युती नाही. राजकारणात अश्या खूप चर्चा असतात.
- पण हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, असे म्हटले जाते. खरे काय?
माङयाही कानावर अशा बिनबुडाच्या चर्चा येतात. 
- मुख्यमंत्नीपदात तुम्हाला रस आहे ?
माङो मन आता दिल्लीमध्ये रमले . ते  महाराष्ट्रात सध्या तरी यायला तयार नाही. त्यामुळे मुख्यमंत्नी पदाची चर्चा असली तरी इथे मी कशाला येऊ ? दिल्लीत महाराष्ट्राचा मी राजदूत आहे, तिथेच मला राहायचे आहे. एक मात्न सांगतो, महाराष्ट्रच्या विकासासाठी मी बांधील आहे. प्रगतीसाठी जे होईल ते सारे करेल. देशात  महाराष्ट्र क्र मांक एक चे राज्य व्हावे यासाठी वाटेल ते करेन. 
 
चौकशी करणार
तीन वर्षे जी कामे ज्या फायली रखडल्या त्यावर शेवटच्या तीन महिन्यात  सरकारने निकाली काढल्या, तेव्हा धोरण लकवा कुठे गेला. त्या फायलीची चौकशी करणार. निर्णय तपासू नाहीतर फेरनिर्णय घेऊ .